सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील धुळवड या गावातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी ‘होय आम्ही करोडपती-लखपती धुळवडकर’ असा आशयाचा बॅनर लावला आहे. हे बॅनर सोशल मीडिायवरही चांगलेच व्हायरल झाले आहे. टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे शेतक-यांना लाखो रुपयात उत्पन्न मिळाले आहे. या गावातील १२ हून अधिक शेतकरी कोट्यधीश तर ५० हून अधिक शेतक-यांनी ५० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर इतर शेतक-यांनाही मोठा फायदा झाल आहे. त्यामुळे करोडपती – लखपतीचे बँनर या गावात झळकले आहे.
विशेष म्हणजे गावातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी हे बॅनर लावले आहे. गेल्या काही दिवसात टोमॅटोचा दर जवळपास २०० रुपये किलो आहे. त्यामुळे शेतक-याच्या २० किलोच्या कॅरेटला २ हजार अडीच हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे शेतक-याला चांगले पैसे मिळत आहे. नाशिक जिल्हा तसा टोमॅटो उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. येथील बहुतांश शेतक-यांना या भाव वाढीचा फायदा झाला आहे.
पण, त्यांनी असा आनंद व्यक्त केला नाही. पण, धुळवड येथील शेतक-यांना थेट बॅनर लावत आपला आनंद व्यक्त केल्यामुळे त्यांचे हे बॅनर लक्षवेधी तर ठरले. पण, हे बॅनर चांगलेच चर्चेत राहिले. राजकीय नेते नेहमीच असे बॅनर लावतात. पण, त्याची फारशी चर्चा होत नाही. पण, या बॅनरची मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर हे बॅनर व्हायरल झाल्यामुळे त्याच्या चर्चेने सीमारेषाही ओलांडल्या आहे.