सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर नगरपालिकेचा लाचखोर मुख्याधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. संजय महादेव केदार (वय ४४ वर्ष, मुख्याधिकारी (वर्ग १), सिन्नर नगरपरिषद) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. रो हाऊसच्या बांधकामाला परवानगी देण्यासाठी त्याच्याकडे प्रस्ताव आला होता. एकूण ५ रो हाऊससाठी लाचखोर केदारने ५ हजार रुपयांची मागणी केली होती.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका नागरिकाने सिन्नर नगरपालिकेत रो हाऊस बांधकाम परवानगीचा प्रस्ताव सादर केला होता. एकूण ५ रो हाऊसचे बांधकाम करायचे होते. त्यासाठी एका रो हाऊसचे १ हजार याप्रमाणे पाच रो हाऊसचे एकूण ५ हजार रुपयांची लाच केदार याने मागितली. त्यानंतर एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला आणि त्यात लाचखोर केदार रंगेहाथ सापडला. याप्रकरणी लाचखोर केदारवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
– सापळा अधिकारी
PI मीरा आदमाने, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो. 9921252549
– सापळा पथक*-
HC /चंद्रशेखर मोरे
PN /प्रवीण महाजन
PN /प्रभाकर गवळी
चालक HC /संतोष गांगुर्डे
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
– मार्गदर्शक* –
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.नं. 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. मो.नं. 9823291148
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. मो.नं. 9822627288.
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक- 02532578230, 02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४ .
Nashik Sinner Crime ACB Trap Bribe Corruption