नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासगी ट्रॅव्हल बसला आग लागून तब्बल १४ प्रवासी होरपळून ठार झाले या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच आज भाऊबीजेच्या दिवशी एक भीषण दुर्घटना घडली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर एसटी महामंडळाची शिवशाही बस थेट वीजेच्या खांब्यावर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की निम्मा खांब थेट शिवशाही बसखाली आला. सुदैवाने आग लागण्यासह अन्य दुसरी कुठली दुर्घटना घडली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवशाही बस नाशिकहून पुण्याकडे जात होती. त्याचवेळी नाशिकरोडकडे जात असताना पासपोर्ट ऑफिसच्या समोरच्या बाजूस शिखरेवाडी कॉर्नर येथे या बसला भीषण अपघात झाला. ही बस थेट वीजेच्या खांब्यावर धडकली. या अपघातात वीजेचा खांब पूर्ण वाकला आणि बसच्या खालपासून ते वरपर्यंत तो अडकला. अचानक झालेल्या या अपघाताने सारेच प्रचंड धास्तावले. क्षणाचा विलंबही न करता सारे प्रवासी पटापट खाली उतरले. सुदैवाने वीजेच्या खांबाच्या ठिकाणी, तारेवर किंवा बसमध्ये आगाची घटना घडली नाही. त्यामुळे मोठा अपघात टळला. या अपघाताबाबत मनसेचे नेते विक्रम कदम यांनी फेसबुकपोस्टद्वारे व्हिडिओ टाकून माहिती दिली आहे. बघा, या अपघाताचा व्हिडिओ
https://www.facebook.com/watch/?v=8053041861437301
Nashik Shivshahi Bus Major Accident Video