मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे आणि युवानेते खा. श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मधील उबाठा गटाच्या श्रीमती इंदुबाई सुदाम नागरे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सचिव समिना शोएब मेमन या तीन माजी नगरसेवकांनी आणि उबाठाच्या किमान वेतन सल्लागार समिती सदस्य विक्रम नागरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी ठाणे येथे हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी, शिवसेना सचिव मा. भाऊसाहेब चौधरी साहेब, शिवसेना उपनेते विजय (अप्पा) करंजकर, सहसंपर्क प्रमुख राजू (अण्णा) लवटे, महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे, युवती सेना कोअर कमिटी सदस्य, माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर, योगेश म्हस्के आदी उपस्थित होते.
त्यांउबाठाच्या इंदुबाई नागरे या सातपूर विभागातून बिनविरोध निवडून आलेल्या माजी नगरसेविका आहेत. जुने नाशिक परिसरातून तीन वेळा नगरसेविका असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समिना शोएब मेमन या अखिल भारतीय मेमन जमातच्या राष्ट्रीय सचिवपदी कार्यरत आहेत. उबाठाचे किमान वेतन सल्लागार समिती सदस्य विक्रम नागरे यांनी भाजपा कामगार आघाडीचे माजी प्रदेश सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे.
जिल्ह्यातून या नेत्यांनी घेतला प्रवेश
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंती दिनी शक्तिस्थळ ठाणे येथे पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. या प्रवेशावेळी नाशिक जिल्ह्यातून उबाठा व मनसे मधून मोठ्या प्रमाणात शिवसेनेत इनकमिंग झाली. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नाशिक जिल्ह्याभरातून मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. या पक्ष प्रवेशात माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, मा. उपसभापती देवराम भस्मे (त्र्यंबक पंचायत समिती), मा.जिप सदस्य कमळू कडाली तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य, नाशिक बाजार समिती संचालक नामदेव सराई, सरपंच, उपसरपंच , पदाधिकारी यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.