नाशिक – उद्यापासून शहर व जिल्ह्यातील पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरू होत आहेत. त्यामुळे शाळांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे. सद्यस्थितीत माध्यमिकचे वर्ग सुरू आहेत. आता प्राथमिक विभागाचेही वर्ग सुरू होत आहेत. कोरोना निर्बंध आणि नियमावलीचे पालन करुन शाळा सुरू केल्या जात आहेत. उद्या शाळा सुरू होत असल्याने त्यापूर्वी शाळांचे सॅनिटायझेशन, स्वच्छता, विविध सुविधांची पूर्तता आदी कामे केली जात आहेत. राज्यभरात १ डिसेंबरपासूनच पहिलीपासूनचे वर्ग सुरू झाले आहेत. कोरोना विषाणू्च्या ओमिक्रॉन अवतारामुळे नाशिकमधील शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबवण्यात आला होता. आता त्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या (१३ डिसेंबर) पासून शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक आदींमध्ये उत्साह असून सर्व तयारी आता पूर्णत्वाकडे आहे. बघा, शाळांमधील जय्यत तयारीचा व्हिडिओ
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/185604640448098/