नाशिक – शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गोल्फ क्लब मैदानावर दररोज पहाटे व सायंकाळी नागरिक ध्यान, योगा किंवा व्यायामासाठी येतात. उच्चभ्रूंपासून सर्व स्तरातील नागरिक येथे येऊन आपली सकाळ प्रसन्न करीत असतात. मात्र, आज सकाळी या मैदानावर युवक आणि युवतींनी नाच गाण्यांचा कार्यक्रम केला. लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी लावून हे सर्व जण नाच करीत होते. त्यामुळे मैदानावर सकाळी व्यायाम करणारे, ध्यान/योगा करणारे या सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागला. मैदानाच्या ठिकाणी विविध सोयी-सुविधा नुकत्याच साकारण्यात आल्या आहेत. मैदानावर कुठल्या गोष्टींना परवानगी आहे किंवा कशाला परवानगी नाही याची नियमावली बनवून दर्शनी भागात लावली पाहिजे. तसेच, या प्रकाराची दखल घेत संबंधित तरुण-तरुणींवर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. बघा खालील व्हिडिओ
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/989711081952221/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C