नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकार आणि प्रशासनातील सावळागोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. जिवंत शेतकऱ्याला चक्क मृत ठरविण्यात आले आहे. त्यामुळेच या शेतकऱ्याला सरकारी योजनेपासूनही वंचित ठेवण्यात आले आहे. हा शेतकरी माजी सरपंचही आहे. या प्रकारामुळे सध्या शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे.
लखमापूर येथील शेतकरी व माजी सरपंच रमेश केदा बच्छाव यांना पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर मृत घोषित करून पीएम किसान योजनेचे मिळणारे अनुदान गोठवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे पीएम किसान योजनेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करूनही अनुदान मिळत नसल्यामुळे संबंधित विभागाकडे चौकशी केला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
बच्छाव यांना ७ जुन २०२२ पर्यंत पीएम किसान योजनेचे अनुदान नियमित मिळत होते. त्यानंतर अनुदान येणे बंद झाले. त्यानंतर शासनाच्या अटीप्रमाणे आधार कार्ड लिंक करूनही अनुदान येत नसल्याने पोर्टलवर चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्याने बच्छाव यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
Nashik Satana Lakhmapur Farmer Government Injustice