इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारमधील पाटणा हादरले आहे. कारण, येथे एक संतापजनक घटना घडली आहे. ७३ वर्षीय वृद्धेला बेदम मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच हे थांबले नाही तर या महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला. नराधमांनी या महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पाईपही टाकले. या सर्व प्रकारात या वृद्धेचा तडफडून मृत्यू झाला आहे. वृद्धेचा मृतदेह आणि तिची अवस्था पाहून अनेकांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे.
फुलवारी शरीफ परिसरात ही भीषण घटना घडली आहे. ७३ वर्षीय वृद्धेच्या मृतदेहाची स्थिती पाहणाऱ्यांना सामुहिक बलात्काराच्या क्रूरतेची ग्वाही मिळाली आहे. वृद्धेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. जुन्या वैमनस्यातून हे झाल्याचे बोलले जात आहे.
ही वृद्ध महिला घरासमोरील अंगणात खाटीवर झोपली होती. अचानक काही जण तिथे आले आणि त्यांनी वृद्धेला जबरदस्तीने उचलले. आणि घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली नेले. तेथे या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. सामुहिक बलात्कार करण्यात आला. अतिशय क्रूरपणे या महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या महिलेच्या अंगावर एकही कपडा नव्हता. शिवाय शरीराचा कोणताही भाग सुरक्षित नव्हता. छातीवर अनेक वेळा दगड मारण्यात आल्याच्या खुणा आहेत. तसेच, या महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पाईप घालण्यात आले. अतिशय क्रूर या घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींनी हे सर्व केल्याचे बोलले जात आहे. आता याप्रकरणी पोलिस काय करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच योग्य ती कारवाई करण्यात येईल.
National Crime Bihar Gang rape 73 Year Old Women