नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या देवी सप्तशृंगी गडावर आदिमाया सप्तशृंगी देवीचा गाभारा आज अतिशय चैतन्यमयी आणि प्रसन्न दिसत आहे. आज हा गाभारा द्राक्ष आणि फुलांनी सजविण्यात आला आहे. आज सर्वत्र माघी गणेश जयंती साजरी होत आहे. तसेच, उद्या भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर तिरंगी रंगाच्या फुलांनी आकर्षकपणे गाभारा सजविण्यात आला आहे. तर, देवीच्या मूर्तीभोवती द्राक्षांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. एका भाविकाने अतिशय श्रद्धापूर्वक ही आरास केली असून ती सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तसेच, यामुळे देवीचा गाभारा अतिशय प्रसन्न बनला आहे.
Nashik Saptashrungi Devi Temple Flower Decoration