India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अरेरे… आईच्या मांडीवरच चिमुकल्याने सोडले प्राण! नायलॉन मांज्याने असा घेतला जीव

India Darpan by India Darpan
January 25, 2023
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संक्रांत आटोपली असली तरी पतंगबाजीचा क्रम सुरूच आहे. पतंग उडविण्यासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असल्याने अपघातांची मालिकाही सुरूच आहे. पालघरजवळच्या हमरापूर-गाळतरे रस्त्यावर हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. कारच्या सनरूफमधून आठवर्षीय चिमुकला उभा राहून हिरवेगार डोंगर, शेतीचे दृश्य बघत होता. अचानक मांजामुळे गळा कापला गेला. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्णवाहिकेतच आईच्या मांडीवर त्याने प्राण त्यागले.

मुंबईच्या कांदिवली येथील दिशान तिवारी हा आजी-आजोबा, आई-वडील, बहीण हमरापूर गाळतरे येथे फिरण्यास आले होते. संध्याकाळी कारमधून फिरत असताना दिशान कारचे सनरूफ उघडून उभा राहून निसर्ग पाहत होता. अचानक पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या गळ्यात अडकला. त्याचा गळा कापला गेल्याने मोठी जखम झाली. त्याला नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले; परंतु रक्तस्राव व गळ्याची नस कापल्यामुळे त्याची प्रकृती अतिगंभीर होत गेली. पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेत असताना आई-वडिलांच्या मांडीवरच त्याने अखेरचा श्वास घेतला.

हॉटेल व्यावसायिक जखमी
पुण्यातूनही अशीच घटना समोर येत आहे. मोटरसायकलवरून जात असताना रस्त्यात पतंगाच्या मांजामुळे हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापला गेला. श्रीकांत लिपाणे (२७) असे त्यांचे नाव आहे. वारजे येथील ढोणेवाडाजवळ हा प्रकार घडला. श्रीकांत लिपाणे हे मोटरसायकलवरून आईला घेऊन पुनावळे येथून जांभुळवाडीकडे सर्व्हिस रोडने जात होते. ढोणेवाडाजवळ रस्त्यावर अर्धवट लटकलेल्या पतंगाच्या मांजामुळे त्यांचा गळा कापला. लोकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. याप्रकरणी निखिल गोपीनाथ लिपाणे (जांभुळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पक्षीही जखमी
राज्याच्या वेगवेगळ्या भागांतूनच मांजामुळे होणाऱ्या अपघाताची माहिती पुढे येत आहे. पण, नायलॉन मांजाचा त्रास काही मानवापूर्ता मर्यादित राहिला नाही. पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर अपाय होतो आहे. संक्रांतीपासून अनेक पक्ष्यांचा बळी गेला आहे. जखमी पक्ष्यांवर सामाजिक संस्थांसोबतच वनविभागाकडूनची उपचार केले जात आहेत.

Mumbai Crime Nylon Manja Children Death


Previous Post

विद्यार्थ्यांची समस्या जाणून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली MPSCकडे केली ही मागणी

Next Post

माघी गणेश जयंती आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भगवती सप्तशृगींचा गाभारा असा फुलला

Next Post

माघी गणेश जयंती आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भगवती सप्तशृगींचा गाभारा असा फुलला

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group