सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते शिर्डी या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन गेल्याच आठवड्यात झाले. आणि आज पहाटेच्या सुमारास या मार्गावर भीषण कार अपघात झाला आहे. कार दुभाजकावर आदळून थेट दुसऱ्या मार्गावर गेली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. तर, कारमधील २ ठार झाले असून २ गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त कार ही मुंबईहून शिर्डीकडे जात होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार दुभाजकाला धडकली. त्यानंतर ती दुसऱ्या मार्गावर गेली. ही कार दोन ते तीन वेळा पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच मदतकार्य करण्यात आले. कारमधील चौघांना तातडीने कोपरगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांना मृत घोषित करण्यात आले. धरमसिंग गुसिंगे आणि राजेंद्र राजपूत अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर भरतसिंग परदेशी आणि नंदिणी हे दोन जण गंभीर दखनी आहेत. महामार्ग पोलिसांनी तत्काळ मदतकार्य करीत अपघातग्रस्त कार बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.
उदघाटनानंतर
समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उदघाटन गेल्या वर्षी करण्यात आले आहे. त्यानंतर शिर्डी ते भरवीर (नाशिक) या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन गेल्याच आठवड्य़ात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
Nashik Samruddhi Highway Car Accident