नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे पंचवटी कॉलेजजवळील पुलाच्या ठिकाणी अपघाती निधन झाले. ते नाशिकहून बुधवारी रात्री पिंपळगाव बसवंत येथे होंडा सिटी कारने जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पार्थिवावर पिंपळगाव बसवंत येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मानस पगार हे ३२ वर्षांचे होते. ते सत्यजित तांबे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या एकुणच आक्रमक कामामुळे व जनसंपर्कामुळे त्यांना काँग्रेसने ग्रामीण युवक काँग्रेसची जबाबदारी दिली होती. ते सोशल मीडियातही अॅक्टीव होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिक पदवीधर मतदार संघात त्यांनी महत्त्वाची भूमिका घेऊन तांबे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. आज या निवडणुकीचा निकाल असताना पगारे यांचे निधन झाले. त्यांच्या या अपघाती निधनानंतर सत्यजित तांबे यांच्यासह राज्यभरातील अनेक नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
नाशिक (ग्रामीण) जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे मानस पगार यांना भावपूर्ण श्रद्धांजली..! pic.twitter.com/EMgUtCDiy5— Maharashtra Youth Congress (@IYCMaha) February 2, 2023
Nashik Rural Youth Congress President Manas Pagar Accident Death