येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उन्हामुळे पाण्याच्या शोधात असलेला सांबर जातीचे सांबर बंधा-याजवळ पाणी पिण्यासाठी गेले असता गाळात फसल्याने चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर मागून हल्ला करत त्याचे लचके तोडले. यात सांबर गंभीर जखमी झाले आहे.
तालुक्यातील उत्तर पुर्व भागातील रेंडाळे परिसरात हरणाची मोठी संख्या असून या ठिकाणी ही घटना घडली. परिसरातील नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत जखमी सांबराला सुरक्षित ठिकाणी उचलून आणले. त्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आल्यानंतर तासाभरानंतर सांबराला उपचारासाठी नेण्यात आले. उन्हाळ्यात पाण्यासाठी हरणाचे कळप सर्वत्र भटकत असतात. त्यामुळे ब-याच वेळा त्यांच्या जीवावर बेतते.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1653674784780357634?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1653674755013378048?s=20
Nashik Rural Yeola Animals Dog Bite Deer Injured