India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक पोलिसांच्या हाती लागले मोटारसायकल चोर; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

India Darpan by India Darpan
May 3, 2023
in क्राईम डायरी
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली कॅम्प पोलिसांनी तीन दुचाकी चोरांना गजाआड केले असून त्यांनी अनेक चोरीच्या गुह्यांची कबुली दिली आहे. या चोरांकडून पोलिसांनी नऊ दुचाकींसह तीन रेसर सायकली असा सुमारे १ लाख ७४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.किरण राजू गांगुर्डे (१९ रा.वरचे चुचाळे,अंबड), गौरव गणेश लहामटे (२४ रा.टाकेद बु.ता.इगतपुरी) व गणेश आनंदा गुप्ता (रा.खालचे चुंचाळे,अंबड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे.

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गेल्या मंगळवारी (दि.२५) भगूर येथे सापळा लावल्याने संशयित पोलिसांच्या हाती लागले. विनानंबर मोटारसायकलस्वार परिसरात संशयास्पद फिरत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी धाव घेत किरण गांगुर्डे याच्या अहुजा कॉम्प्लेक्स भागात मुसक्या आवळल्या. चौकशीत त्याने अंबड दत्तनगरसह जिह्यातून दोन्ही साथीदारांच्या मदतीने अनेक चो-या केल्याची कबुली दिली.

त्यानुसार दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी चोरीच्या नऊ दुचाकी आणि तीन रेसर सायकली असा सुमारे १ लाख ७४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधिन केला. त्यात पाच स्प्लेंडर दोन पॅशन आणि तीन सायकलींचा समावेश आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रकाश गिते,उपनिरीक्षक संदेश पाडवी, लियाकत पठाण, हवालदार रमाकांत सिध्दपुरे, सुनिल जगदाळे, शाम कोटमे पोलिस नाईक राहूल बलकवडे, सुभाष जाधव, नितीन करवंदे, शिपाई विजय कोकणे, एकनाथ बागुल, दिपक जठार आदींच्या पथकाने केली.


Previous Post

नाशकात ट्रॅव्हल बसमधून सर्रास गांजाची वाहतूक; पोलिसांनी असा केला पर्दाफाश

Next Post

भटक्या कुत्र्यांच्या हल्यात सांबर जखमी; येवला तालुक्यातील घटना

Next Post

भटक्या कुत्र्यांच्या हल्यात सांबर जखमी; येवला तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक फोटो

विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष द्या! MHT CET परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

June 9, 2023
सुनिता धनगर

अखेर शिक्षण विभागाला जाग लाचखोर सुनीता धनगर हिच्यावर केली ही कारवाई

June 9, 2023

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group