India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कडाक्याच्या थंडीचा पोलिस भरतीतील शारीरीक परीक्षांवर परिणाम

India Darpan by India Darpan
January 3, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या चालक आणि शिपाई पदासाठी भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. आडगाव येथील मुख्यालयात कागदपत्रांच्या पडताळणी नंतर राज्यभरातून आलेल्या हजारो तरूणांची दिवसभर १६०० मीटर धावणे आणि गोळाफेकच्या माध्यमातून शारिरीक क्षमता जोखण्यात आली. सकाळी तसेच ऊन उतरल्यावर धावण्याची चाचणी घेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र दुपारीही उमेदवारांना धावावे लागले. थंड हवामानामुळे उन्हाचा त्रास उमेदवारांना झाला नसला तरी ताकद कमी पडल्याने ज्या ठराविक वेळेत अंतर पार करणे अपेक्षित होते, त्याला वेळ लागल्याची तक्रार काहींनी केली. ही चाचणी प्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहणार आहे.

नाशिक ग्रामिण पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगत नाशिकसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून तसेच राज्याच्या कानाकोपºयातून तरूण शहरात दाखल झाले आहेत. सोमवारी सकाळी सहापासूनच भरतीसाठी चाचणी प्रक्रिया सुरू होणार असल्याने औरंगाबाद, नांदगाव सह अन्य भागातून येणाऱ्या उमेदवारांनी रविवारी सायंकाळीच नाशिक ग्रामीण पोलिसांचे मुख्यालय गाठले. काहींनी मुख्यालयाजवळ असलेल्या मैदानावर थंडीत कुडकुडत मुक्काम ठोकला. काही बस स्थानकावर झोपून राहिले. चाचणी सुरू होण्यापूर्वी उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. या ठिकाणी पोलीस विभागाकडून केवळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी उशीरापर्यंत उमेदवारांची चाचणी सुरू होती. उमेदवारांनी सादर केलेले काही अर्ज कागदपत्रातील त्रुटींअभावी बाद झाले.

सोमवारी सकाळी १६०० मीटर धावणे, गोळाफेक यात उमेदवारांची शारीरिक क्षमता जोखण्यात आली. सकाळी तसेच ऊन उतरल्यावर धावण्याची चाचणी घेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र दुपारीही उमेदवारांना धावावे लागले. थंड हवामानामुळे उन्हाचा त्रास उमेदवारांना झाला नसला तरी ताकद कमी पडल्याने ज्या ठराविक वेळेत अंतर पार करणे अपेक्षित होते, त्याला वेळ लागल्याची तक्रार काहींनी केली.

उमेदवारांना आवाहन
चाचणी प्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहणार असून ज्या उमेदवारांनी नाशिक ग्रामीण येथे भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन अर्ज भरलेले आहेत. त्यांना महाआयटीकडून प्रवेशपत्र पाठविण्यात आलेले आहेत. संबंधित उमेदवारांनी ओळखपत्राच्या दोन प्रती, अर्जाच्या दोन छायांकित प्रती, सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रतींचा संच तसेच पासपोर्ट आकाराच्या सहा छायाचित्रांसह त्यांना बोलावलेल्या दिवशी सकाळी सहा वाजता आडगाव पोलीस मुख्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik Rural Police Recruitment Winter Cold Effect


Previous Post

पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

Next Post

घरफोडीचे सत्र सुरुच; दोन घरफोडीत चोरट्यांनी पावणे दोन लाखाचा ऐवज केला लंपास

Next Post
प्रातिनिधिक फोटो

घरफोडीचे सत्र सुरुच; दोन घरफोडीत चोरट्यांनी पावणे दोन लाखाचा ऐवज केला लंपास

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group