नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाचा ध्वजारोहण समारंभ राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज सकाळी 9:15 वाजता पोलिस संचलन मैदान, नाशिक येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 20 मिनीटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने कोणीही सोबत बॅग आणू नये. तसेच नागरीक व शासकीय अधिकारी यांनी राष्ट्रीय पोषाखात तर गणवेषधारी अधिकारी यांनी नियमानुसार पोषाखात कार्यक्रमास उपस्थित रहावे, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
Nashik Republic Day Guardian Minister Rule