नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाची वार्ता आहे. कारण, आता रेशन कार्डसाठी नाशिकरोडच्या विभागीय आयुक्तालय परिसरातील धान्य वितरण कार्यालयात जाण्याची गरज नाही. या कार्यालयामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार होती. अखेर हा कार्यालय आता जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक शहरातील नागरिकांना महत्त्वाचे असणारे धान्य वितरण अधिकारी कार्यालय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात येऊन नवीन प्रशासकीय इमारतीत सदर कार्यालय सुरू होणार आहे. याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी केलेल्या प्रयत्नांना यामुळे यश प्राप्त होणार आहे. नाशिक शहरातील रेशन कार्ड संदर्भातील समस्या, तसेच नवीन रेशन कार्ड घेणे इत्यादी कामासाठी नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालय येथे वर्ग करण्यात आलेल्या धान्य वितरण अधिकारी कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे रेशन कार्ड घेणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल होत होते.
दोन ते अडीच वर्षांपूर्वी नाशिकरोड येथे वर्ग करण्यात आलेले कार्यालय पुन्हा नाशिक येथे शिफ्ट व्हावे म्हणून आमदार देवयानी फरांदे प्रयत्नशील होत्या. त्यांनी शासनाला याबाबत पत्र व्यवहार देखील केलेला होता. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत सदर कार्यालय शिप करण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाधरन डी, निवासी जिल्हाधिकारी, भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा नरसिंगे अधिकारी, धन्य पुरवठा अधिकारी पवार, तहसीलदार अनिल दोंदे, यांच्या समवेत कार्यालयाची पाहणी करून कार्यालय सदर ठिकाणी शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक शहरातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यातूनच रेशन कार्ड उपलब्ध होणार आहे.
Nashik Ration Card Office Translocation Big Decision