नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या १६९ व्या दुर्गशोध अभ्यास मोहिम (दि ९/४/२०२३ रोजी) झाली. या दुर्गशोध मोहिमेत दुर्गसंवर्धकांनी रामशेजच्या कड्याकपरीचा चाहुबाजूने अभ्यासात्मक शोध घेतला. त्यात रामशेजच्या नैसर्गिक कातीव अभेद्य कड्याच्या पोटात एकूण ११ गुहा आढळल्या, तर चाहुबाजूने अतिशय दुर्मिळ वनस्पती, वनौषधी वृक्ष व विविध पक्षी आढळले,कडाक्याच्या उन्हात यावेळी दुर्गसंवर्धकांनी 3 गट तयार करून दिवसभरात ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.यापुढेही या मोहिमेचा दुसरा टप्पा होईल असे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक तथा दुर्गअभ्यासक राम खुर्दळ यांनी सांगितले.
नाशिकची शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था गेल्या 2000 सालापासून अखंडीपणे नाशिक जिल्ह्यातील ६० हुन अधिक किल्ल्याच्या संवर्धन,११ प्राचीन होळकर बारवा,ज्ञात अज्ञात विरगळी व ऐतिहासिक ठेवा शोध,पावसाळ्यात वृक्षारोपण,बीजारोपण,व उन्हाळ्यात लागणारे वणवे विझवण्यात स्वखर्चाने व श्रमदानातून राबत आहे.अजिंक्य दुर्ग रामशेजच्या २३ वर्षे अभ्यासपूर्ण पद्धत्तीने अखंडित दुर्गसंवर्धन मोहिमा करून येथील झुडपात मातील नष्ट होणारा,ऐतिहाशिक ठेवा,विविध जलश्रोत,दुर्मिळ झाडे,तसेच दुर्गजागृती साठी अविरतपणे राबत आहे.
यावेळी रविवारच्या मोहिमेत रामशेजच्या चाहुबाजुने ज्ञात अज्ञात ऐतिहाशिक,नैसर्गिक पाऊलखुणा,व दुर्मिळ जैवविविधतेच्या शोध अभ्यास मोहीम झाली,या।मोहिमेत तीन गट केले,एक गट रामशेजच्या कपरींचा सुरक्षित शोध घेत तर दुसरा मध्यभागी जलश्रोत शोध,व तिसरा चाहुबाजूने दुर्मिळ वनस्पती शोध घेत होते,त्यात रामशेजच्या कपारीत ११ गुहा आढळल्या,मध्यभागी विविध घळीत कातीव असंख्य दगड,गोलाकार दगडी आढळली तर किल्ल्याच्या चाहुबाजूने पिंपळ,बाभूळ,काटे-साबर,भोकर,दैवस,अडुळसा,गुर्तुली,शेकडो वर्षे जुने उंबराचे झाड, चिंच, चिलार, अडुळसा, कोरपड, साबर, हिवर, सिंदल, चाफा, करवंद, रानमोगरा तसेच पश्चिम पोटात वनविभागाने लावलेली बांबू व सागाची काही झाडे आढळली.
या वृक्षांत बहुतांशी दुर्मिळ वनस्पती औषधी प्रकारातील आहे.तर काही फुले,फळे देणारी व काही जाळी,कुंपण तयार करणारे वृक्ष आहेत,दरम्यान याठिकाणी दरवर्षी लागणारा वणवा यामुळे मात्र या दुर्मिळ वनस्पती सोबत येथील मोर,दुर्मिळ लाहुरी पक्षी, गुहेत असणारा ससाणा विस्तापित होत आहे.याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे.येथील वणवा लागतो कुठून याचा शोध वनविभागाने घ्यावा अशी मागणी ही दुर्ग व वृक्षमित्रांनी यावेळी केली.
दरम्यान रामशेज युद्धात वापरलेली दगड गोटे अधिक प्रमाणात किल्ल्याच्या चाहुबाजूने दिसतात,तर किल्ल्यावर कातलेली बांधकामाची असंख्य दगड घळीत पडलेली आहेत.मोहिमेच्या अखेरीस येत्या १४ मे रोजी रामशेजच्या माथ्यावर गोमुखी द्वारात होणाऱ्या छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव नियोजन बैठकीत विविध जबाबदारीचे प्रयोजन करण्यात आले.
Nashik Ramshej Fort Guha Conservation