मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
होळी पासून ते रंगपंचमी पर्यंत रंगांचा उत्सव साजरा केला जातो, रंगांची उधळण म्हणजे आनंद होय. महाराष्ट्रातील विविध प्रांतांमध्ये हा रंगांचा उत्सव वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. परंतु नाशिक शहरामध्ये मात्र रंगपंचमीला रंगांची उधळण होते.
विशेष म्हणजे या शहरातील तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या रहाड म्हणजेच मोठ्या हौद होय. यात ही रंगपंचमी अत्यंत जल्लोषात खेळण्यात येते. जुने नाशिक आणि पंचवटी भागात अशा अनेक रहाडी असून त्या आता खुल्या करण्यात आल्या आहेत, उद्या या रहाडीमध्ये अबालवृद्ध रंगाने न्हाऊन निघतील. या रहाडीत रंग खेळण्यासाठी दरवर्षी शेकडो नागरिकांची झुंबड उडते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा रहाडी रंगोत्सव साजरा झाला नाही. कोरोनामुळे या उत्सवावर बंद होती. तत्पूर्वी एकदा दुष्काळामुळे ही रहाड बंद होती. मात्र, यंदा तो उत्साहात साजरा होणार आहे.
https://twitter.com/maha_tourism/status/1506512092316188674?s=20
नाशिकमधील अत्यंत जुनी परंपरा असलेला हा ऐतिहासिक पेशवेकालीन रहाड रंगोत्सव राज्यभरात प्रसिद्ध आहे. राज्यात अनके ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करत रंग खेळला जातो. मात्र, नाशिक येथे होळीनंतर पाचव्या दिवशी मोठ्या उत्साहात रहाड रंगोत्सव साजरा केला जातो. यंदा हा रंगोत्सव उद्या मंगळवार दि. २२ मार्च रोजी मोठ्या उत्साहात होणार आहे. रहाड म्हणजे भला मोठा भूमिगत हौद. या रंगोत्सवात शहरातील रहाडींमध्ये रंग करून मोठ्या उत्साहात सण साजरा केला जातो.
https://twitter.com/bhiku_07/status/1506239425659150342?s=20
जुन्या नाशिकमधील शिवाजी चौकात साती आसरा मंदिरासमोर एका पेशवेकालीन रहाडीचा शोध लागला आहे. यावर्षी ही रहाड रंगोत्सवासाठी खुली करण्यात येणार होती. मात्र, दुरुरुस्तीच्या कामाखातर ती उघडता येणार नाही. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा रंगोत्सव साजरा झाला नाही. मात्र, शहरातील कोरोना निर्बंध हटवल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार यंदा या ऐतिहासिक रंगोत्सवाला पोलीस आणि प्रशासनाने परवानगी दिली आहे.
https://twitter.com/swaruprahane88/status/1505902157832548354?s=20
जुने नाशिक भागात पेशवेकाळात बांधलेल्या रहाडी म्हणजेच भूमिगत मोठे हौद आहेत. या रहाडीवरून सतत वाहतूक, रहदारी सुरू असते. मात्र, रंगोत्सवाच्या आधी या रहाडी खोदल्या जातात. त्यांची साफसफाई, स्वच्छता, डागडुजी केली जाते. त्यांची पूजा होते. या रहाडीत रंग टाकून त्यांच्यात पाणी भरले जाते. रंगपंचमीदिवशी या रहाडीभोवती तरुण गोल उभे राहतात. रहाडीतल्या पाण्यात तरुण जोरदार सूर मारतात. तरुण पाण्यामध्ये पडल्यावर त्या धप्प्याने काठावर उभे असलेले सारेच रंगात न्हाऊन निघतात. रहाडीमध्ये असे सूर मारून जोरदार रंगपंचमी साजरी केली जाते. यावेळी रहाडीमध्ये उंच उडी मारण्यासाठी तरुणांमध्ये स्पर्धा रंगते.
https://twitter.com/NarayanKharat13/status/1506116015247163396?s=20
विशेष म्हणजे रहाडीतील रंगोत्सवासाठी रंग वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. त्यासाठी पाने, फुले, हळद, कुंकू हे सर्व पदार्थ एकत्र करून चार ते पाच तास एका भांड्यात गरम करून ठेवतात. तिवंधा चौक आणि शनी चौकातील रहाड खोल आणि रूंद आहे. रंगोत्सव संपल्यानंतर सागवानी लाकडांचे मोठमोठया फळ्याचा वापर करून ही रहाड बुजवली जाते. या रगाडीत रंगाचे पाणी असते. त्यावर उसाचे चिपाड आणि माती टाकली जाते. ही रहाड पुन्हा थेट पुढल्या वर्षी रंगपंचमीसाठी खुली केली जाते.
https://twitter.com/Prasad_garbhe/status/1238525164880424962?s=20
जुने नाशिकमध्ये जुनी तांबट गल्ली, तिवंधा चौक, काजीपुऱ्यातील दंडे हनुमान चौक, गाडगे महाराज पुलाखालील दिल्ली दरवाजा, पंचवटीतील शनी चौक आणि शिवाजी चौकातील साती आसरा मंदिरासमोर या रहाडी आहेत. या रहाडीमध्ये रंगोत्सव खेळण्यासाठी गुलाबी रंग टाकला जातो. या रंगात अंघोळ केल्यामुळे कसलाही त्वचारोग होत नाही. उन्हाळ्यात उन्हाचा कसलाही त्रास होत नाही, म्हटले जाते.
https://twitter.com/jeevan_tambat/status/1506298345039581193?s=20
Nashik Rangapanchami 300 Years Old Tradition Rahad Panchami Colours