नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी मालेगावमध्ये जाहीर सभा आहे. त्यासाठी ते नाशिक दौऱ्यावर येत आहे. असे असतानाच ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे सिंदे गटाने ठाकरे गटाला पुन्हा एकदा दणका दिला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला भगदाड पाडण्याची रणनिती शिंदे गटाने तयार केली आहे.
शिंदे गट शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक महानगर पालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती आणि विद्यमान उपमहनगर प्रमुख शशिकांत कोठुळे, माजी नगरसेवक उत्तम दोंदे, माजी नगरसेविका अॅड श्यामला हेमंत दीक्षित, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ शोभा गटकाळ, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगला भास्कर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शोभा मगर, अनिता पाटील, ज्योती देवरे, आशा पाटील, सीमा पाटील, प्रभाकर पाळदे, माजी उपमहानगरप्रमुख शरद देवरे , शिवसैनिक निलेश भार्गवे आदींनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सरकारच्या माध्यमातून नक्कीच सोडवण्यात येतील असे याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले. यासमयी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/hMvNL8D59K
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 26, 2023
? 'मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगाव', *उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेसाठी उर्दू होर्डिंग*
सगळीकडे जोरदार चर्चा
https://t.co/vXhhrLdQKT#indiadarpanlive #urdu #uddhavthackeray #sabha #malegaon #hoardings— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 26, 2023
Nashik Politics Leaders Join Shinde Group Shivsena