नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील दुचाकी वाहनांचेच सर्वाधिक टोईंग करणाऱ्या ठेकेदारावर नाशिक पोलिस मेहेरबान झाले आहेत. शहरात सुरू असलेल्या वाहनांच्या टोईंग कामकाजावर नाशिक वाहतूक पोलिस अत्यंत खुष आहेत. शहरात पार्किंगची योग्य ठिकाणे नसतानाही वाहने टोईंग केली जात असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शिवाय कंत्राटदार अधिक पैसे मिळत असल्याने केवळ दुचाकी वाहनांनाच लक्ष्य करीत आहे. तीन चाकी वाहने कुठेही, केव्हाही आणि कशाही पार्क केलेल्या असल्या तरी कंत्राटदार त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. वाहनधारकांच्या त्यासंदर्भात अनेक तक्रारी असल्या तरी नाशिक पोलिसांनी कंत्राटदाराला गिफ्ट दिले आहे. या कंत्राटदाराचे पुढील तीन महिन्यांचे कंत्राट पुन्हा देण्यात आले आहे. म्हणजेच, कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे.
दुचाकीच लक्ष्य का
नाशिक शहर वाहतूक पोलिसांचा टोईंग कंत्राटदाराबरोबर जो करार आहे. त्यात टोईंगचे जे दर ठरले आहेत त्यानुसार, कंत्राटदार केवळ टू व्हिलर आणि फोर व्हिलरचेच टोईंग करतो. किंबहुना कंत्राटदाराला टू व्हिलरच्या टोईंगमध्येच ‘परवडते’. कारण, एकाच वाहनात तो एकावेळी ३ ते ४ टू व्हिलरचे टोईंग करतो. टू व्हिलरचे टोईंग केले तर कंत्राटदाराला ९० रुपये मिळतात आणि सरकारला २०० रुपये. म्हणजेच, टू व्हिलर धारकाला टोईंगपोटी २९० रुपये मोजावे लागतात. कंत्राटदाराने एकाचवेळी ३ टू व्हिलरचे टोईंग केले तर त्याला २७० रुपये मिळतात.
तर, फोर व्हिलर धारकांना कंत्राटदाराचे ३५० आणि सरकारचे २०० असे ५५० रुपये अदा करावे लागतात. विशेष म्हणजे, थ्री व्हिलरला मात्र बिनबोभाट कुठेही, केव्हाही आणि कसेही पार्किंग करण्याची मुभा आहे. कारण, थ्री व्हिलरचे टोईंग केले तर कंत्राटदाराला अवघा १ रुपया मिळतो. तर सरकारला २०० रुपये. ज्या अर्थी कंत्राटदाराला १ रुपया मिळतो त्याअर्थी कंत्राटदार थ्री व्हिलर ऐवजी टू व्हिलर आणि फोर व्हिलरच्याच टोईंगला पसंती देतो.
अशी असते पद्धत
असे आहेत टोईंगचे दर