नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीला विमाने बनविण्यापोटी अधिकचे काम मिळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असतेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. देशालगतच्या सीमा सुरक्षित असाव्यात यापोटी वायूदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले HTT-4O जातीचे विशेष ट्रेनर विमाने तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
खासदार गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे HTT-40 जातीचे सत्तर विमाने तयार करण्याचे काम ओझर येथील एचएएल कंपनीला मिळाले असून यासाठी सहा हजार आठशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे तिन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम मिळणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे. खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे काम मिळाल्याने एचएएल कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विविध जातीचे विमाने तयार करण्याची एचएएल ही केंद्र शासनाची मोठी कंपनी असून ओझर एचएएल मध्ये आजपर्यंत अनेक जातींच्या विमानांची निर्मिती झाली आहे. येथील कारखान्यात सुमारे तिन हजार अधिकारी,कर्मचारी कार्यरत आहेत.विविध जातींची यशस्वी विमाने तयार करण्यात एचएएल प्रशासनाचा मोठा हातखंड आहे.परंतु गेल्या काही वर्षापासून एचएएलकडे कामाचा ओघ काहीसा कमी आहे. यातूनच विमाने तयार करण्याचे वाढीव काम एचएएल कंपनीला मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून खा.गोडसे प्रयत्नशील होते.काही महिन्यांपूर्वी खा. गोडसे यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल मंडलिक, सेक्रेटरी संजय कुटे, गिरीश पाटील, प्रशांत आहेर, नितीन पाटील आदींनी दिल्ली येथे जात संरक्षण विभागाचे सेक्रेटरी अजय कुमार यांची भेट घेतली होती. ओझर एचएएलला विमान निर्मितीची ऑर्डर देण्याचे साकडे यावेळी खा.गोडसे यांनी अजयकुमार यांना घातले होते.
खा.गोडसे यांची ओझर एचएएल कंपनी मधील अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या विषयीची असलेले तळमळ आणि आग्रही मागणी न्यायिक असल्याने मनोज कुमार यांनी सकारात्मक दखल घेतली.खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुरावामुळे वायूदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याचे क्षमता असलेले HTT-4O जातीचे ट्रेनर विशेष विमाने तयार करण्याचे काम एचएएलला देण्याचे निर्णय सरंक्षण विभागाने घेतला असून पैकी दहा विमानांची निर्मिती बंगलोर येथील एचएएलमध्ये तर उर्वरित साठ विमानांची निर्मिती ओझर एलएएलमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी सहा हजार आठशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
वायूदलात नव्याने दाखल झालेल्या वैमानिकांना HTT-4O जातीचे ट्रेनर विमानाव्दारे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या विमानाचे ताशी स्पीड चारशे किलोमीटर असणार असून विमान एकाच वेळेस तीन तास हवेत राहू शकणार आहे. सदर विमान पुर्णतः भारतीय बनावटीचे असणार आहे. HTT-4O जातीचे विमाने तयार करण्याच्या कामाला येत्या काही दिवसात प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.
Nashik Ojhar HAL Big Contract Trainer Aircraft Manufacturing