India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशकात नायलॉन मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले; पोलिसांकडून आता थेट या कारवाईला सुरुवात

India Darpan by India Darpan
January 8, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घातक नायलॉन मांजा विक्री, साठवणूक यावर बंदी असली तरी त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळेच शहर परिसरात विविध घटना घडत आहेत. याची अखेर गंभीर दखल नाशिक पोलिसांनी घेतली आहे. शहरातील चार विक्रेत्यांवर थेट तडीपारीची कारवाई नाशिक पोलिसांनी केली आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांचे धाबे अक्षरशः दणाणले आहेत.

नाशिक पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नायलॉन मांजा प्रकरणी आता अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. बंदीचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याने थेट तडीपारीची कारवाई करण्याचे आदेश आयुक्त शिंदे यांनी दिले आहेत. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी अंबड परिसरातील ४ विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई केली आहे. त्यामध्ये अजिंक्य प्रदीप भिसे (वय ३४, त्रिमूर्ती चौक, सिडको), बाळासाहेब खंडेराव राहींज (वय ४१, चरणदास मार्केट, संत ज्ञानेश्वर नगर, जेलरोड, नाशिकरोड), समाधान राजेंद्र मोरासकर (वय १९, गणेश चौक, सिडको), हेमंत वीरेंद्र काला (वय १९, हेडगेवार नगर, सिडको) या चार विक्रेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान, नायलॉन मांजा बंदीचे कसोशीने पालन करावे. अन्यथा यापुढील काळात यापेक्षा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त शिंदे आणि उपायुक्त खांडवी यांनी दिला आहे.

Nashik Nylon Manja Ban Police Strict Action Crime Tadipar


Previous Post

विमानातील लघवी प्रकरणः त्या दिवशी विमानात नेमकं काय घडलं? आरोपी शंकर मिश्राच्या सहप्रवाशाने सगळं सांगितलं…

Next Post

भाजपशी जवळीक वाढल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रथमच पंतप्रधान मोदींवर केले हे सडेतोड भाष्य

Next Post

भाजपशी जवळीक वाढल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रथमच पंतप्रधान मोदींवर केले हे सडेतोड भाष्य

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group