बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता नाशिक महापालिकाही खरेदी करणार कोरोना प्रतिबंधक लस

by India Darpan
मे 18, 2021 | 2:19 pm
in स्थानिक बातम्या
0
कोरोना लस

कोरोना लस


नाशिक – १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध व्हावी यासाठी नाशिक महापालिकाही आता लस खरेदी करणार आहे. मुंबई आणि पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
    नाशिक शहरात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दि.१३ मे २३ या दरम्यान कडक लॉकडाउन जाहीर केलेला असतांना आज मितीस ९०० ते १००० पेशंट आढळुन येत आहे. कडक लॉकडाऊन असतांना ही परिस्थिती आहे तर लॉकडाऊन ओपन झाल्यास काय होईल असा प्रश्न महापौर यांनी उपस्थित केला आहे.
शहरात  कामानिमित्त व व्यवसाया निमित्त बाहेर पडणारा वर्ग हा वय वर्षे १८ ते ४४ पर्यंतचा असुन त्यांच्या सुरक्षितते साठी त्यांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. आज मितीस नाशिकची परिस्थिती दुस-या लाटेमध्ये भयंकर झालेली असतांना तिस-या लाटेत परिस्थिती काय होऊ शकते याचा विचार डोळयासमोर ठेऊन लसीकरणाचा निर्णय घेण्यासाठी व -नाशिक शहरातील नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने मनपाने लस खरेदी करण्याबाबत महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्त कैलास जाधव यांचेसह मनपा पदाधिकारी यांची बैठक झाली. मनपास लवकरात लवकर लस उपलब्ध होणार असल्यास त्वरित लस खरेदीचा निर्णय घेण्यात येईल असा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

IMG 20210518 WA0047

              मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील आयुक्त दालनाच्या शेजारील सभागृहात लस खरेदी करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी बैठक झाली. यावेळी महापौर, आयुक्त, उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, सभागृहनेते सतीश सोनवणे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते जगदीश पाटील, विलास शिंदे, शाहू खैरे, गजानन शेलार, नंदिनी बोडके, दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते.
नाशिक शहरातील लोकसंख्येचा विचार करता १८ ते ४४ या वयोगटातील सुमारे पाच लक्ष नागरिकांचे लसीकरण करावे लागणार असून त्यादृष्टीने या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे या अनुषंगाने सध्या शासनाकडून लस उपलब्धता अल्प प्रमाणात होत असून शहरातील या वयोगटातील लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लस खरेदी करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली.
शासनाकडून ऑगस्टपासून लस उपलब्ध होईल असा साधारणता अंदाज असून तत्पूर्वी महापालिकेस लस उपलब्ध होत असल्यास ती खरेदी करणे योग्य होईल.तसेच ती लस खरेदी करताना स्वतंत्र ग्लोबल टेंडर न काढता मुंबई,पुणे ठाणे या महापालिकांनी जे ग्लोबल टेंडर काढले आहे त्यांचे दरांचा आढावा घेऊन  त्यांच्याकडून या लस प्राप्त करून घेणे सोयीस्कर होईल. त्यासाठी त्या महापालिकांचे दर व लस किती दिवसात उपलब्ध होईल याची सविस्तर माहिती घेण्यासाठी व चर्चा करणेसाठी आयुक्त यांना महापौर व उपस्थित सर्व पदाधिकारी व गटनेते यांनी त्या अनुषंगाने लस खरेदीचा निर्णय घेण्याची चर्चा या बैठकीत झाली.
तसेच नाशिक मनपासाठी किती लस खरेदी करावी याबाबत स्वतंत्र आढावा बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत सध्या सुरू असलेले लसीकरण, रेमडीसीविर इंजेक्शन उपलब्धता,घरोघरी जाऊन लसीकरणाची व्यवस्था करणे,मनपास लवकरात लवकर लस उपलब्ध झाल्यास खाजगी कंपन्या,दवाखाने यांना लस उपलब्ध करून देणे त्यामुळे लसीकरण केंद्रावर होत असणारी गर्दी टाळता येणे शक्य होईल अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – वलयांकित – जागतिक आरोग्यदूत सौम्या स्वामिनाथन

Next Post

आज आहे गुगलचा ऍन्युअल डे; थोड्याच वेळात लॉन्च होणार हे प्रॉडक्ट

India Darpan

Next Post

आज आहे गुगलचा ऍन्युअल डे; थोड्याच वेळात लॉन्च होणार हे प्रॉडक्ट

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
आपत्ती व्यवस्थापन

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ वारीत ठरतोय लक्षवेधी

जून 25, 2025
Untitled 16

ऐश्वर्या गौडा आणि इतर १७ आरोपींविरुद्ध ईडीने केला खटला दाखल…विविध उच्च प्रोफाइल राजकारण्यांशी जवळीक

जून 25, 2025
Untitled 72

इराणवर युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा इस्रायलच्या आरोप, इराणचा इन्कार

जून 25, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून साधला संवाद…झाली ही चर्चा

जून 25, 2025
crime11

सायबर भामट्यांनी शहरातील चार जणांना साडे ५५ लाख रूपयांना घातला गंडा….अशी केली फसवणूक

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011