आज आहे गुगलचा ऍन्युअल डे; थोड्याच वेळात लॉन्च होणार हे प्रॉडक्ट

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
गुगलचा वार्षिक कार्यक्रम अर्थात ऍन्युअल डे ची सगळ्यांनाच खूप क्रेझ असते, विशेषत: टेक्नोसॅव्ही लोकांना. गेल्यावर्षी काेरोनामुळे गुगलने हा कार्यक्रम रद्द केला होता. पण यंदा मात्र, १८ मे रोजी रात्री १०.३० वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम २० मे पर्यंत चालणार आहे. अर्थात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रमही व्हर्च्युअली होणार आहे.
गुगलचा हा इव्हेंट तुम्हाला google I/O या संकेतस्थळावर ऑनलाइन पाहता येईल. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरही हा कार्यक्रम पाहता येईल. पण, यातील काहीगु खास भाग पाहण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. गुगलच्या या इव्हेंटमध्ये गुगल पिक्सेल 5 a या स्मार्टफोनसह अनेक प्रॉडक्ट्स लाँच होण्याची शक्यता आहे.
या इव्हेंटच्या सुरुवातीला कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांचे भाषण होईल. त्यानंतर बहुप्रतिक्षित गुगल पिक्सेल 5a हा स्मार्टफोन लाँच होऊ शकतो. त्याचबरोबरच गुगल पिक्सेल 4a या स्मार्टफोनचे अपग्रेडेड व्हर्जनही बघायला मिळू शकते. याशिवाय पिक्सेल वॉच लाँच होण्याची शक्यता आहे. आणि पिक्सेल बड्सचे कमी किंमतीतील व्हर्जन पिक्सेल बड्स A देखील लाँच होईल.
या इव्हेंटमध्ये गुगलकडून एक स्मार्ट वॉच लाँच होण्याची शक्यता आहे. हे घड्याळ WearOS या नवीन प्रणालीने ऑपरेट होणारे असेल. यात एकही बटण असणार नाही. ऍप्पल आणि वन प्लस प्रमाणे या घड्याळातही हार्ट रेट सेन्सर देण्यात आला आहे.
एकंदरीत ज्यांना टेक्नॉलॉजीची आवड आणि समज आहे अशांसाठी हा इव्हेंट म्हणजे निश्चितच पर्वणी ठरणार आहे. तेव्हा टेक्नोसॅव्ही लोकांनी या इव्हेंटचा निश्चितच आनंद घ्यायला हवा.