नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड परिसरातील चुंचाळे घरकुल योजनेच्या जवळ असलेल्या भंगार दुकानाला पहाटे सुमारास लागलेल्या आगीत ९ दुकाने जळून खाक झाल्याचे वृत्त आहे.. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, मोठे आर्थिक नुकसान झाले. या आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यानंतर उंच उचं धुराचे आणि आगीचे लोट दिसत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. पण, या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली. ही आग कशी लागली याचे कारण अद्याप पुढे आले नाही. या परिसरात २५ हून अधिक भंगाराची दुकाने आहेत. त्यातील ९ दुकानांना आग लागल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर अंबड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. उन्हाळा सुरु झाल्यानंतर आगीच्या घटना नेहमी घडत असतात. पण, ही आग रात्री लागल्यामुळे त्याचे नेमके कारण समजू शकले नाही.