नाशिक – नंदिनी नदीच्या चरातील अडथळे दूर झाल्याने पाणी प्रवाहीत झाले असून, दुर्गंधी कमी झाली आहे. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशन आणि रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहेत. नंदिनी नदीच्या चरात अडथळे निर्माण झाल्याने डबक्यांमध्ये पाणी साचले होते, यामुळे दुर्गंधी पसरली होती, डासांचा प्रादुर्भावही वाढला होता. चरातील अडथळे दूर करून पाणी प्रवाहीत करावे, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते आणि रहिवाशांनी २१ ऑक्टोबर २०२१ रोजी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेवून ९ डिसेंबरपासून सतत काही दिवस महापालिकेने रोबोट मशीनने चरातील अडथळे दूर केले. उंटवाडी, दोंदे पूल आणि त्यापुढील काही भागात हे काम पूर्ण झाले, यामुळे पात्र काही प्रमाणात स्वच्छ झाले, पाणी प्रवाहीत झाले, दुर्गंधी कमी झाली, डासांचा प्रादुर्भावही कमी झाला. नागरिकांच्या आरोग्याचा धोका टाळण्यासाठी आणि नंदिनीचे प्रदूषण रोखण्यासाठी वेळोवेळी अशाप्रकारे नंदिनीची स्वच्छता करावी, अशा प्रतिक्रिया उंटवाडी, तिडकेनगर, जगतापनगर, कर्मयोगीनगर, बाजीरावनगर, गोविंदनगर भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, श्रीकांत नाईक, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, संजय टकले, विनोद पोळ, अनंत संगमनेरकर, पोपट तिडके, नितीन तिडके, संजय तिडके, सचिन राणे, मनोज वाणी, डॉ. शशीकांत मोरे, बापू आहेर, यशवंत जाधव, नीलेश ठाकूर, वंदना पाटील, मीना टकले, उज्ज्वला सोनजे, प्रतिभा पाटील, वैभव कुलकर्णी, बापू महाले, मगन तलवार, राहुल काळे, हरिष काळे, प्रथमेश पाटील, संकेत गायकवाड (देशमुख) आदींनी महापालिकेचे आभार मानले आहे.