नाशिक– सिडकोतील खुटवड नगरा भागात रविवारी सकाळी सोसायटीच्या टेरेसवरुन उडी मारत २४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. प्रियंका आकाश पगारे असे मृत विवाहितेचे नाव असून सकाळी साडेदहाच्या सुमारास बिल्डिंगच्या गच्चीवरून उडी मारत तिने आत्महत्या केली. तिच्याकडे सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने स्वखुशीने आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. ही घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी तिला तत्काळ उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात तपासून मृत घोषित केले. प्रियंकाच्या नातलगांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. याबाबत अंबड पाोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.