नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उर्जितावस्थेत आणण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्ली दरबारी प्रयत्न सुरू केले आहे. शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँक एक वरदान असून आर्थिक वाहिणी आहे.विविध कारणांमुळे बँक अडचणीत आल्याने बँकेकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा कर्जपुरवठा होत नाही. शेतकरी आणि ठेवीदार यांना दिलासा देण्यासाठी बँकेला गतवैभव पुन्हा प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्या आक्षेपामुळे अडचणीत आली ते आक्षेप शिथिल करावेत अशी कळकळीची मागणी वजा साकडे खा. हेमंत गोडसे यांनी केंद्रिय सहकार मंत्री नामदार ज्ञानेश कुमार यांना घातले आहे.
जिल्हा बँक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या काही वर्षांपासून नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत आलेली आहे.त्यामुळे शासनाने जिल्हा सहकारी बँकेवर प्रशासक नेमलेले आहेत.बँक प्रशासनाच्या काही चुका आणि हलगर्जीपणामुळे आज मितीस बँक आर्थिकदृष्ट्या खूपच पिछाडीवर गेलेली आहे.याचा फटका जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांना बसत आहे.शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुन्हा गतवैभव मिळवून द्यावे यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे तगादा सुरू केलेला आहे.शेतकऱ्यांची मागणी न्यायिक असल्याने जिल्हा बँकेला उर्जितावस्थेत आणण्यासाठी खासदार गोडसे यांनी दिल्ली दरबारी आता प्रयत्न सुरू केले आहे.
केंद्राचे सहकार मंत्री नामदार ज्ञानेश कुमारजी यांची आज खा.गोडसे यांनी दिल्लीत भेट घेतली.वेगवेगळ्या कारणांमुळे बॅक आर्थिक पिछाडीवर गेल्याने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची व्यथा यावेळी खा.गोडसे यांनी नामदार कुमारजी यांच्यापुढे मांडली. बँकेने ठेवी आरबीआय किंवा एमएससी बँकेकडे न ठेवता नॅशनल बँकेत ठेवी ठेवल्याने शासनाने बँकेला लावलेला सतरा कोटी रुपयांचा लावलेला दंड माफ करावा, केंद्र शासनाने नोटबंदी लागू केल्याने बँकेकडे आज मितीत पडून असलेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या एकवीस कोटी रुपयांच्या नोटा व्हॅलिड मनी म्हणून गृहित धराव्यात, जिल्ह्यातील अर्बन बँकांनी जिल्हा बँकेकडे ठेवी ठेवल्याने शासनाने त्यांच्यावर बंधन लादलेली आहेत.
लादलेल्या बंधनांमधून अर्बण बँकांना रिलॅक्सेशन द्यावे,नाशिक सहकारी साखर कारखान्यातील तत्कालीन कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे दीड कोटी रुपये जिल्हा बँक प्रशासन देण्यास तयार असून पीएफ प्रशासनाने लावलेले दंड आणि इतर चार्जेस रद्द करावेत अशा आग्रही मागण्यांचे निवेदन खा.गोडसे यांनी नामदार ज्ञानेश कुमार यांना दिले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या जिल्हा बँकेच्या विषयीच्या या मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही नामदार ज्ञानेश कुमार यांनी खा. गोडसे यांनी दिली आहे.
Nashik NDCC Bank MP Godse Letter Amit Shah