नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पुर्वतयारीसाठी व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकावार घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षण शिबिरांच्या तयारीसाठी व पक्षाच्या विविध कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तालुकावार निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
लवकरच हे निरीक्षक आपल्याला नेमून दिलेल्या तालुक्यात जातील व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पुढील कार्यक्रमांचे नियोजन करतील असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी म्हटले आहे.
तालुकावार निरीक्षक पुढील प्रमाणे-:
येवला तालुका / निफाड पूर्व तालुका- दिलीप खैरे, डॉ. योगेश गोसावी,
नांदगाव तालुका- बाळासाहेब कर्डक,
मालेगाव पूर्व तालुका- अंबादास खैरे,
नांदगाव शहर- ज्ञानेश्वर शेवाळे,
मनमाड शहर- भाऊसाहेब भवर, कैलास मुदलियार,
चांदवड तालुका- समाधान जेजुरकर,
देवळा तालुका- यु.के.आहेर,
दिंडोरी तालुका- जगदीश पवार,
पेठ तालुका- विजय पवार, गोकुळ झिरवाळ,
कळवण तालुका- रघुनाथ आहेर, बबन शिंदे,
सुरगाणा तालुका- आबासाहेब देशमुख,
बागलाण तालुका- उमेश खातळे, विलास सानप,
निफाड तालुका- सुनिल कबाडे, राजेंद्र जाधव,
मालेगाव तालुका- राजाराम मुरकुटे, सोमनाथ खातळे
Nashik NCP Upcoming Election Taluka Observer Declare