नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील अनधिकृत वृक्षतोडबाबत नाशिक महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. नवीन वर्षात मनपाच्या पश्चिम उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडून विभागातील वेगवेगळ्या आठ ठिकाणी अनधिकृत वृक्षतोडी बाबत आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ७,५५,००० रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.
त्र्यंबक नाका येथील ओम सर्व्हिसस्टेशन पंप, मयुर गॅस एजन्सी, सर्वांगी साडी सेंटर तसेच बांधकाम विभागाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधीत पोलीस स्टेशनद्वारे कायदेशीर कार्यवाही सुरु आहे. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे पथक वृक्षतोडीच्या घटनांकडे लक्ष ठेवीत आहे. ही मोहीम आता आणखी कडक केली जाणार आहे.
शहरातील नागरीकांनी वृक्ष छाटणी आणि वृक्ष तोडण्या करीता मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन रितसर परवानगी घेऊनच पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा महानगरपालिकेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मनपा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे उप आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.
https://twitter.com/my_nmc/status/1623381574459994113?s=20&t=XxuNv7880OpV3q9P65JJHQ
Nashik Municipal Corporation Illegal Tree Cutting Fine