बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

असे आहे नाशिक महापालिका आयुक्तांचे व्हिजन; शहरात होणार ही विकासकामे

ऑक्टोबर 14, 2022 | 6:17 pm
in स्थानिक बातम्या
0
Chandrakant Pulkundvar

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माझे मूळ गाव नांदेड व आत्ताच्या नियुक्तीचे ठिकाण नाशिक या दोन्ही शहरांना गोदावरीचा आशीर्वाद लाभला आहे. त्यामुळेच माझ्या नाशिक शहराबाबतच्या विकासाच्या व्हिजनमध्ये अन्य उपक्रमांसोबत गोदावरी नदी ही प्राथमिकता असल्याचे प्रतिपादन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सी. एल. पुलकुंडवार यांनी केले ते नाशिक मेट्रो तर्फे आयोजित संवाद या कार्यक्रमात बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या नाशिकची भुरळ सर्वांनाच पडते. त्यामुळे 34 वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेल्या बांधकाम व्यवसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था क्रेडाई ची शहर विकासातील भूमिका मोलाची आहे. यासोबतच क्रेडाईने वेळोवेळी घेतलेल्या समाज उपयोगी उपक्रमांचे देखील त्यांनी कौतुक केले. शहर विकासाबाबत बोलतांना आयुक्त डॉ.सी.एल.पुलकुंडवार यांनी खालील बाबींवर आगामी काळात काम करणार असल्याचे सुतवाच केले.

असे आहे मनपा आयुक्तांचे नाशिक व्हिजन
1. नमामी गोदाप्रकल्प राबवून गोदावरी नदी व काठ स्वच्छ सुंदर व प्रदूषण मुक्त करणे अहमदाबाद मधील साबरमती रिव्हर फ्रंट च्या धरतीवर काम.
2. नाशिक शहरातील रस्ते कसे टिकतील यासाठी मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासोबतच तज्ञांचे मार्गदर्शन दर्शन घेणार तसेच COEP किंवा IIT अशा संस्थांकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्यावर विचार.

3. किमान पुढील 50 वर्षांकरिता शहराला पाण्याची चिंता नसली तरी वितरण व्यवस्थेत सुसूत्रता आणणार तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पास अपग्रेड करणार.
4. पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्यास सोबतच अतिक्रमणावर कठोर कारवाई करणार.

5. नाशिकच्या बाहेर रिंग रोड साठी भूमी अधिग्रहणासाठी विविध पर्यायांची चाचपणी सुरू असून शहराचे संचलन सुरळीत होण्यासाठी भविष्यातील रिंग रोडची गरज ओळखून शहरासाठी रिंग रोड आवश्यक.
6. प्रस्ताविक निओ मेट्रो, सेमी स्पीड रेल्वे,आयटी / लॉजिस्टिक पार्क हे प्रकल्प लवकरच पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा.

7. मनपाच्या नगर रचना विभागाचे सुसूत्रीकरण करण्यात येईल.
8. चोविस तासात बांधकाम परवानगी मिळणार तसेच नवीन बांधकामाच्या सोबतच असेसमेंट तसेच त्वरित पाण्याची जोडणी देण्यावर देखील विचार.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकात बोलताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की, शहर विकासामध्ये क्रेडाईने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असून सर्व सदस्य नियमांचे काटेकोर पालन करतात. संवाद या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे नवीन आयुक्तांची शहर विकासाबाबतची भूमिका समजावून घेणे असून क्रेडाईतर्फे नेहमी नाशिक मनपाच्या सर्व उपक्रमांना सक्रिय साथ राहील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

शहर विकासासाठी क्रेडाईच्या सदस्यांनी केल्या या सूचना
1)अनंत राजेगावकर-(क्रेडाई राष्ट्रीय चे उपाध्यक्ष)- नाशिकच्या बाह्य रिंग रोडची रचना हैदराबादच्या 150 मीटर रिंग रोडच्या धर्तीवर करावी,जेणेकरून भविष्यात नाशिकचा विकास सुनियोजित पद्धतीने होईल तसेच गोदावरीसोबतच नासर्डी नदीचा पण विचार व्हावा.
2) जितूभाई ठक्कर-( क्रेडाई राष्ट्रीयच्या घटना समितीचे प्रमुख)- स्मार्ट सिटीसोबत नाशिक ही स्कीलिंग सिटी म्हणून ओळखली जावी यासाठी क्रेडाई सक्रिय भूमिका बजावण्यास तयार.

3) सुनील कोतवाल- (क्रेडाई महाराष्ट्रचे सचिव)- नाशिक ग्रीन ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असून भविष्यातील कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेऊन कचरा डेपोचे विस्तारीकरण होण्याकडे मनपाने लक्ष द्यावे.
4)सुरेश पाटील- (क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष)- घरपट्टीच्या दरात सुसूत्रता आणण्याकडे लक्ष देऊन व्यावसायिक तसेच लीज प्रॉपर्टीवरील घरपट्टी कमी केल्यास बाहेरील अनेक कंपन्या नाशिकमध्ये येऊ शकतील.

5) नेमीचंद पोतदार-(क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष)- नाशिकच्या पूररेषेमधील जमिनीसाठी नवीन TDR पॉलिसी आवश्यक असून त्याकडे मनपाने लक्ष द्यावे.
6) उमेश वानखेडे–(क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष)-नाशिकला समृध्दी महामार्गाने जोडण्यासाठी योग्य नियोजन व्हावे तसेच पर्यटन विकासासाठी टयूलीप/रोज गार्डन बनवावे.

कार्यक्रमास क्रेडाई राष्ट्रीय चे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर , क्रेडाई राष्ट्रीयच्या घटना समितीचे प्रमुख जितूभाई ठक्कर, महाराष्ट्र क्रेडाई चे सचिव सुनील कोतवाल,‌ क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष कृणाल पाटील, मानद सचिव गौरव ठक्कर, माजी अध्यक्ष नेमीचंद पोतदार ,सुरेश पाटील , उमेश वानखेडे तसेच मॅनेजिंग कमिटी सदस्य उपस्थित होते.

Nashik Municipal Commissioner Chandrakant Pulkundwar Vision
Development

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुजरातची निवडणूक का जाहीर झाली नाही? हे आहे कारण

Next Post

नाशिक शहरातील या इमारतींना होणार दंड; विभागीय आयुक्तांचे निर्देश

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
IMG 20221014 WA0020

नाशिक शहरातील या इमारतींना होणार दंड; विभागीय आयुक्तांचे निर्देश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011