बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यात दोन उपमुख्यमंत्री मग आमच्या गावालाही हवे दोन उपसरपंच… या गावच्या सरपंचाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

by India Darpan
ऑगस्ट 3, 2023 | 6:37 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील चंदनपुरी येथील सरपंचाने तहसील कार्यालयाकडे पत्र देऊन आमच्या ग्रामपंचायतीसह राज्यातील इतर ग्रामपंचायतींना देखील दोन उपसरपंच नियुक्त करावेत अशी मागणी केली आहे. या पत्रात राज्यात दोन उपमुख्यमंत्री मग आमच्या गावालाही दोन उपसरपंच देता येईल का? गावाचा विकास करण्यास अधिक मदत होईल असे नमूद केले आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगरचे सरपंच राजीव सुदामराव साळुंके यांनी देखील अशीच मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली होती. पण, या मागणीचे पुढे काहीच झाले नाही.

चंदनपुरी हे गाव राज्यात खंडेरायाचे देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. खंडेरायाची दुसरी पत्नी बानाईचे हे गाव आहे. या गावचे सरपंच विनोद शेलार यांनी तहसील कार्यालयाकडे दिलेल्या पत्रात मार्गदर्शन मागवल्यानंतर या पत्राची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली असून हे पत्र चांगलेच व्हायरल झाले आहे. चंदनपुरी गावची लोकसंख्या ही ६६२३ इतकी असून ग्रामपालिकेत ९ सदस्यांचे संख्याबळ असून २२ कर्मचारी या गावात कार्यरत आहेत. ग्रामपालिकेचे वार्षिक उत्पन्न ३५ लाखांच्या आसपास आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असल्याने गावाला दोन उपसरपंच मिळाल्यास गावाचा जास्तीचा विकास साधता येईल या गोष्टी या पत्रात नमुद केल्या आहे.

या गावचे सरपंच विनोद शेलार यांनी सांगितले की, राज्याला दोन उपमुख्यमंत्री तसेच राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना दोन उपसरपंच द्यावेत अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. दरम्यान तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी ग्रामपंचायत अधिनियमाची तपासणी केली असून याबाबत दोन उपसरपंच नेमण्याबाबत कायद्यात कुठलीही तरतूद नसल्याचे सांगितले.

Nashik Malegaon Village Two Upsarpanch Selection Demand Chandanpuri Sarpanch CM Letter

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Nashik Crime जुगार खेळणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल… रोकडसह साहित्य जप्त

Next Post

भुजबळ मंत्री होताच तब्बल इतक्या कोटींची विकास कामे मार्गी… स्थगिती उठली…

India Darpan

Next Post
chhagan bhujbal1

भुजबळ मंत्री होताच तब्बल इतक्या कोटींची विकास कामे मार्गी... स्थगिती उठली...

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011