मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव तालुक्यात रस्त्या चोरीची फिर्याद सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या फिर्यादीमुळे अधिकारी सुद्धा चक्रावले आहे. तालुक्यातील टोकडे येथे १८ लाख रुपये खर्च करुन (कागदोपत्री) तयार करण्यात आला. त्यानंतर गावातील विठोबा द्यानद्यान यांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा रस्ता शोधणाऱ्याला पाच लाखांचे बक्षिसाची रक्कमही अगोदर जाहीर करण्यात आलेली आहे. या सर्व गोष्टीची दखल घेऊन कार्यकारी अभियंता यांचे एक पथक मालेगावच्या टोकडे येथे दाखल झाले. त्यांनी संपूर्ण गाव परिसरात या रस्त्याचा शोध घेतला मात्र रस्ता मिळून आला नाही.
कागदोपत्री रस्तेच नाही तर शासकीय कामात अनेक विकास कामे अशीच केली जातात. त्याची तक्रार मात्र होत नाही. टोकडे येथे ही तक्रार थेट पोलिस स्थानकात केल्यामुळे हा विषय सर्वांसमोर आला. आता या तक्रारीनंतर शासन कोणती कारवाई करते हे महत्त्वाचे आहे. या कारवाईत संबधितांबरोबर अधिका-यांवर सुध्दा कारवाई झाली तर अशा गोष्टी होणार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Nashik Malegaon 18 Lakh Road Missing