मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये या कारणामुळे वारंवार होतोय वीजपुरवठा खंडीत

by India Darpan
मे 14, 2022 | 5:02 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220514 WA0204

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षी महावितरणकडून मान्सूनपूर्व आगमनाअगोदर विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कार्ये केली जातात, यामध्ये विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासह नियोजन करून इतर महत्वाची कामे केली जातात जेणेकरून पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. नाशिक परिमंडलात ही कामे गतीने सुरू असून जवळपास ५० टक्के पेक्षा जास्त कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांची तात्पुरती गैरसोय होत असली तरी पावसाळ्यामध्ये ग्राहकांना अखंडीत वीज मिळावी म्हणूनच ही कामे केली जातात. तरी ग्राहकांनी संयम राखून या काळात सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे

विद्युत यंत्रणांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करायचे असल्यास सदर कार्य करण्यासाठी त्या भागातील वीजपुरवठा खंडित करावाच लागतो. त्यामध्ये सर्व भागच वा विद्युत वाहिनी खंडित न करता टप्प्याटप्प्याने कामे करून तेवढाच भाग खंडित करून त्या भागातील दुरुस्ती कामे केली जातात. ही कामे पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन जास्त वेळ बंद राहू नये म्हणून उंच वाढत असलेल्या झाडाच्या फांद्या विद्युत यंत्रणेला स्पर्श करीत असेल तर त्या फांद्या तोडणे, फुटलेले पीन आणि इंसुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, रोहीत्रांचे ऑईल तपासणी, ऑइल गळती थांबवणे,वाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहनांचे तात्पुरती असलेले जॉईट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली,जीर्ण झालेल्या वायर बदल, जळालेल्या तुटलेल्या वायर बदलणे, उपकेंद्रातील सर्व यांत्रिक बाबीची व यंत्रणा यांची तपासणी करणे व त्याची दुरुस्ती करणे तसेच प्रत्यक्ष वेळेवर आढळणाऱ्या त्रुटी दीर करून अशा प्रकारची अनेक कामे गतीने केली जातात. मात्र सदर कामे गतीने करीत असताना काही काळासाठी वीजपुरवठा खंडित केला जातो.

महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सर्व अभियंते व कर्मचारी यांना विद्युत सुरक्षितता बाळगून ही कामे योग्य ती काळजी घेऊन गतीने करण्याबाबत निर्देशित केले आहे. त्यानुषंगाने ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा म्हणून हे पावसाळ्यामध्ये यंत्रणा ठप्प न होता अखंडीत पुरवठा व्हावा आणि त्यामुळे ग्राहकांना अखंडित सेवा मिळावी म्हणून ही कामे करत असतात. सोबतच ही कामे करण्याअगोदर ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे सुद्धा यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाते आणि ही कामे योग्य प्रमाणात विभाजन करून त्या प्रकारे एक एक भाग बंद करून ही कामे केली जातात.

ही कामे केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा जोरदार वादळी वारा व पावसामुळे झाडे, फांद्या पडून तारेवरील डिक्स इंसुलेटर वर आकाशातील वीज पडून यंत्रणेचे नुकसान होत असते त्यामुळे त्यानंतरसुद्धा महावितरणची यंत्रणा पूर्ववत व सुरळीत करण्यासाठी कार्य केल्या जाते. मात्र अगोदर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे गतीने वीज पुरवठा सुरळीत करण्यास मदत होते. वाढत्या तापमानामूळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव आहे. देखभाल दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी असून तरी ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली ही प्रतिक्रीया

Next Post

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचा तडकाफडकी राजीनामा

Next Post
FStxxtxaAAEr7 y

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचा तडकाफडकी राजीनामा

ताज्या बातम्या

Sudhakar Badgujar

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना, पण, प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे संभ्रम

जून 17, 2025
Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्यासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011