लासलवगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे सव्वा सहाच्या सुमारास टॅावर वॅगन ट्रेनने चार गँगमनला चिरडल्याची घटना घडली. रेल्वे मार्गाची देखभाल करणाऱ्या या चार जणांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला. हे सर्व कामगार लासलगाव परिसरातील मजूर आहे. या अपघातात संतोष भाऊराव केदारे (३८), दिनेश सहादु दराडे (३५), कृष्णा आत्मराम अहिरे (४०), संतोष सुखदेव शिरसाठ (३८) हे मृत झाले आहे.
या अपघाता बाबत मिळालेली माहिती अशी की, टॉवर लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. पोल नंबर १५ ते १७ मधी ल ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते. सदर काम खालील ट्रक मेंटेनर कर्मचारी काम करत असतांना त्याना रेल्वे लाईनची मेंटनेस करणारे टॅावरने धडक दिल्याने अपघातात झाला. या मार्गावरील ऑफलाइनवर रेल्वे पासून पन्नास मिनिटे ते सहा वाजता पर्यंत ब्लॉक दिल्याचे समजते. आठ ते दहा कर्मचारी कामावर नेमण्यात आले ट्रॅकवर काम करत असताना अचानकपणे टॉवर मशीन आले आणि कोणताही हॉर्न न देता या या कर्मचाऱ्यांना उडवून पुढे निघून गेल्याचे बोलले जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपउपनिरीक्षक गवळी, लासलगाव पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठुले, लासलगाव येथील स्टेशन परिसरातील कार्यकर्त्यांनी या चौघांना डॉ. स्वप्नील पाटील यांच्या दवाखान्यात आणले. येथे त्यांची तपासणी करून या चारही रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच ठार झालेल्या चारही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी जोरदार आक्रोश केला. लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती सौ. सुवर्णा जगताप यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी या ठिकाणी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील लासलगाव येथे टॉवर वॅगन ट्रेनने 4 कर्मचाऱ्यांना उडवले. या अपघातात सर्व 4 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.हा अपघात लासलगाव-उगाव रेल्वे स्थानकादरम्यान घडला.अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व कर्मचारी हे ट्रॅक मेंटेनर आहेत. @RailMinIndia pic.twitter.com/LJPs261c0J
— ℝ?? ???? (@Rajmajiofficial) February 13, 2023
Nashik Lasalgaon Railway Accident 4 Death