इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या बैठकीमध्ये १३ आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. या बैठकीत कुंभमेळयातील अमृत स्थानाच्या तीन, पर्वण्यांचे व पर्वस्नानांचे मुहूर्ताच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.
याव्यतिरिक्त सिंहस्थ पर्वकालातील सर्व एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, वैधृती-व्यतीपात योग इ. दिवस हे भाविकांसाठी तीर्थस्नान-दर्शन पर्व असतील. नाशिक येथे कुंभमेळा २०२७ मध्ये मुख्य तीन पर्वण्यांव्यतिरिक्त पर्वस्नानांचे एकूण ४४ मुहूर्त असून त्र्यंबकेश्वर येथे पर्वस्नानांचे एकूण ५३ मुहूर्त आहेत. भाविकांनी अमृत स्नानांशिवाय पर्वस्नानांच्या दिवशी देखील मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नाशिक कुंभ अमृतस्नान तारीख
पहिले अमृस्नान -२ ऑगस्ट २०२७
द्वितीय अमृस्नान – ३१ ऑगस्ट २०२७
तृतीय अमृस्नान – ११ सप्टेंबर २०२७
त्रंबकेश्वर अमृतस्नान तारीख जाहीर
पहिले अमृस्नान – २ ऑगस्ट २०२७
द्वितीय अमृस्नान – ३१ ऑगस्ट २०२७
तृतीय अमृस्नान – १२ सप्टेंबर २०२७

