शुक्रवार, मे 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कुंभमेळ्यात सामाजिक कार्यातील सहभागासाठी विद्यार्थ्यांना अकॅडमिक क्रेडिट द्यावे….सागर वैद्य यांची विद्यापीठाकडे मागणी

by India Darpan
मे 29, 2025 | 5:28 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250529 WA0219 1 e1748519847127

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या दिशादर्शक तत्वांनुसार, कुंभमेळ्यात स्वयंसेवक म्हणून मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यासाठीच्या क्रेडिट प्रणालीचा वापर करून अकॅडेमिक क्रेडिट (गुण) देण्यात यावे. यासंबंधीचा ठराव आगामी अकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीत घ्यावा अशी मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी विद्यापीठाकडे केली आहे.
यासंबंधीचे निवेदन वैद्य यांनी नुकतेच कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना दिले आहे.

नाशिक येथे २०२६-२७ दरम्यान कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कुंभमेळा हा दर बारा वर्षांनी येणारा एक राष्ट्रीय स्तरावरील भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा असून, या सोहळ्यास लाखो भाविक देशभरातून तसेच परदेशातूनही भेट देतात. या महाउत्सवात विद्यार्थ्यांची विविध कार्यक्षेत्रांमध्ये जसे की, वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन ,आरोग्य सेवा , सीसीटीव्ही नियंत्रण, माहिती तंत्रज्ञान, NCC, NSS, संशोधन, सुरक्षा, पर्यावरण, नदी संवर्धन आदी अनेक व्यवस्थापकीय कार्ये यात मदत घेता येईल. किंबहुना यापूर्वीच्या कुंभमेळ्यात स्वयस्फूर्तीने विद्यार्थी शिक्षक घटकांनी असे योगदान दिलेलेही आहे.

विद्यार्थ्यांच्या या सहभागामुळे प्रशासनाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांना नागरी शिस्त, संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आणि सामाजिक जबाबदारी यासारख्या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळेल. अशा प्रकारच्या अनुभवामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यासाठी कौतुकास्पद पुढाकार घेवून शैक्षणिक समन्वय समितीही याकामी स्थापन केली आहे. पोलिस प्रशासनानेही विद्यापीठाला यासंबधीचे पत्र पाठवले आहे.

विद्यापीठाने त्या अनुषंगाने, नाशिक कुंभमेळ्यामध्ये सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याच्या स्वरूपानुसार अकॅडमिक क्रेडिट्स प्रदान करावे जेणेकरून NEP चा यथोचित उद्देशही सफल होईल आणि विद्यार्थ्यांसाठी हा केवळ धार्मिक उत्सवातील सहभाग न राहता शैक्षणिक उपक्रमही ठरून त्यांच्या ज्ञान परंपरेत वाढ होईल. शिक्षक, शैक्षणिक संस्था यांनाही याचा मूल्यांकन वाढीसाठी उपयोग होईल. तरी याबाबत आपण योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी विनंती वैद्य यांनी विद्यापीठाला केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय दुचाकीस्वार ठार

Next Post

मुक्त विद्यापीठाच्या या शाखेतर्फे सात शिक्षणक्रमांच्या नवीन अभ्यासकेंद्र प्रस्तावसाठी १६ जून मुदत

Next Post
ycmou gate 1

मुक्त विद्यापीठाच्या या शाखेतर्फे सात शिक्षणक्रमांच्या नवीन अभ्यासकेंद्र प्रस्तावसाठी १६ जून मुदत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी विचारपूर्वक गुंतवणूक करा, जाणून घ्या, शनिवार, ३१ मेचे राशिभविष्य

मे 30, 2025
J

राष्ट्रपतींच्या हस्ते जळगावच्या सुजाता बागुल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

मे 30, 2025
IMG 20250530 WA0299 e1748613490983

नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत ‘इंडस्ट्रीयल मिट’

मे 30, 2025
IMG 20250530 WA0311 e1748613086393

अखेर अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिला हा निर्णय….

मे 30, 2025
kvk ycmou 1

मुक्त विद्यापीठात मधमाशीच्या सहाय्याने सेंद्रिय पद्धतीने वाढवलेला ‘मधुर’ केसर आंबा वाजवी दरात उपलब्ध…

मे 30, 2025
cricket

महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी नाशिकच्या या दोन पंचाची निवड…

मे 30, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011