नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही वर्षांपुर्वीच अद्ययावत झालेल्या कालिदास कलामंदिरातील वातानुकुलित यंत्रणा (एसी) बंद असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, सध्या उन्हाचा पारा चाळीशी पार करीत आहे. त्यामुळे जीवाची काहिली होत आहे. असे असतानाच कालिदासमधील एसी बंद आहेत. या सभागृहात एसीची सुविधा असल्याने पंखे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एसी आणि पंखे असे दोन्ही नसल्याने प्रेक्षक प्रचंड घामाघूम झाले आहेत. परिणामी, प्रेक्षकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नाशिक महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण काही वर्षांपूर्वीच करण्यात आले आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यात येथील एसी बंद असल्याची बाब समोर आली आहे. कालिदासमध्ये कार्यक्रम घेणाऱ्या आयोजकांनाही याची काहीच माहिती नसल्याचेही दिसून येत आहे. या सर्व प्रकाराबद्दल प्रेक्षकांमधून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे.
बघा, कालिदासमधील हा व्हिडिओ
Nashik Kalidas Auditorium AC not working