नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी जवळील जिंदाल पॉलिमर कंपनीतील दुर्घटनेप्रकरणी कंपनीच्या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दोन दिवसांपूर्वीच कंपनीला भेट दिली होती. या कंपनीतील भषण अग्नितांडवामध्ये ३ कामगारांचा मृत्यू तर अनेक कामगार जखमी झाले होते.
जिंदाल कंपनीतील दुर्घटनेला कंपनी प्रशासन जबाबदार असल्याचे दानवे यांनी म्हटले होते. स्थानिकांना रोजगार मिळावा आणि दुर्घटनेसंदर्भात काय कार्यवाही झाली याची शहानिशा करण्यासाठी दानवे यांनी परवाच कंपनीचा दौरा केला होता. त्याची दखल घेत अखेर घोटी पोलिस स्टेशनमध्ये कंपनीच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यात जिंदाल पॉलि फिल्म प्रा. लि. कंपनीचे भोगवटदार, कारखाना मॅनेजर,पॉलि फिल्म प्लँट बिझनेस हेड, प्रोडक्शन मॅनेजर, मेन्टेनन्स विभागप्रमुख, प्रोडक्शन डिपार्टमेंट शिफ्ट इंचार्ज आणि प्लँट ऑपरेटर यांचा समावेश आहे. पोलिसांनी कलम ३०४(अ), ३३७, ३३८,२८५,२८७,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुर्घटनेला कंपनी व्यवस्थापनाचा कारभार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यामुळे मृत कामगारांसह जखमी कामगारांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे.
https://twitter.com/iambadasdanve/status/1627646324714905600?s=20
Nashik Jindal Company 7 Fir Registered Ghoti