India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गौरवास्पद! वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या ईश्वरी सावकारची निवड; सातत्यपूर्ण फलंदाजीची BCCIकडून दखल

India Darpan by India Darpan
October 10, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रिकेटसाठी महिला क्रिकेटमधील अजून एक आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकार ची देखील वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. रसिका शिंदे , माया सोनवणे व प्रियांका घोडके या तिघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात यापूर्वीच निवड झाली आहे.

ईश्वरी ला बीसीसीआय स्पर्धेतील सातत्यपूर्ण फलंदाजीची ताबडतोब पावती मिळाली . भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित , चंदिगड येथे झालेल्या १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड सार्थ ठरवत कर्णधार व सलामीची उकृष्ट फलंदाज म्हणून स्पर्धेत महाराष्ट्र तर्फे सर्वाधिक धावा केल्या तर भारतात तिसऱ्या स्थानी राहुन चांगली छाप पाडली. स्पर्धेतील पाच पैकी तीन सामने महाराष्ट्र संघाने जिंकले . सलामीवीर म्हणून पाचही सामन्यांत ईश्वरी सावकारने अतिशय सातत्यपूर्ण कामगिरी करताना महाराष्ट्र संघाच्या धावसंख्येत वेळोवेळी मोठा वाटा उचलला. ईश्वरीने स्पर्धेत केलेल्या संघांनीहाय धावा अशा : मिझोराम विरुद्ध ४० ,केरळ ४१ , वडोदरा ४६, मणिपूर ३९ व हरयाणा विरुद्ध २७.

ईश्वरीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाने मिझोराम व केरळ विरुद्धचे पहिले दोन्ही सामने जिंकून जोरदार सुरुवात केली . त्यानंतर तिसर्‍या समन्यात वडोदरा विरुद्ध महाराष्ट्राला केवळ २ धावांनी निसटता पराभव स्वीकारवा लागला . चौथ्या सामन्यात पुनरागमन करत मणिपूर वर महाराष्ट्र संघाने मोठा विजय मिळविला. या सामन्यात संधि मिळलेल्या नाशिकच्या जलदगती गोलंदाज शाल्मली क्षत्रियने प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन करताना दोन षटकात केवळ ७ धावा देत १ गडी बाद केला .पाचव्या व शेवटच्या साखळी सामन्यात मात्र हरयाणाने ५६ धावांनी विजय मिळवला.
ईश्वरी च्या ह्या महत्वपूर्ण निवडी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे , खास अभिनंदन करून भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बीसीसीआयची १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी स्पर्धा .
संक्षिप्त धावफलक व निकाल
महाराष्ट्र वि हरियाणा – हरियाणाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली .
हरयाणा – २० षटकांत ६ बाद १२८ – सोनिया मेंधिया ४०, त्रिवेणी वसिष्ठ नाबाद ४०. वि
महाराष्ट्र – १६.५ षटकांत सर्वबाद ७२ – श्वेता सावंत २८, , ईश्वरी सावकार २७. हरयाणा ५६ धावांनी विजयी.
महाराष्ट्र वि मणिपूर – महाराष्ट्र ने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
महाराष्ट्र – २० षटकांत २ बाद १७६ – के एन मुल्ला ९८, ईश्वरी सावकार ३९ वि.

मणिपूर -१४.५ षटकांत सर्वबाद ४२ – श्वेता सावंत ४, समृद्धि बनवणे व इशिता खळे प्रत्येकी २ तर शाल्मली क्षत्रिय व व आचल अगरवाल
प्रत्येकी १ बळी . महाराष्ट्र १३४ धावांनी विजयी.
महाराष्ट्र वि वडोदरा – वडोदरा ने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
वडोदरा १९.४ षटकांत – सर्वबाद १०९ – निधि धरमुनिया ४८ , उत्कर्षा कदम व श्वेता सावंत प्रत्येकी 2 बळी.
महाराष्ट्र – २० षटकांत ९ बाद १०७ – ईश्वरी सावकार ४६, श्वेता सावंत २८ . जानकी राठोड ३ व नृपा २ बळी. वडोदरा २ धावांनी विजयी.
सूरत येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित , वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत – ११ ऑक्टोबर – दिल्ली , १४ ऑक्टोबर – कर्नाटक , १६ ऑक्टोबर – हरयाणा. १८ ऑक्टोबर – माणिपूर, २० ऑक्टोबर – हिमाचल प्रदेश , २२ ऑक्टोबर – आसाम.

Nashik Ishwari Sawkar Selection BCCI Women’s Cricket Team


Previous Post

इगतपुरी-कसारा दरम्यान नवी रेल्वेलाईन आणि बोगद्याच्या डीपीआरसाठी पावणेनऊ कोटी रूपये मंजूर

Next Post

राज्यातील या चार ग्रीनफिल्ड स्मार्ट औद्योगिक शहरांचा होणार विकास

Next Post

राज्यातील या चार ग्रीनफिल्ड स्मार्ट औद्योगिक शहरांचा होणार विकास

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group