बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक आहे चक्क भरडधान्याची राजधानी; कशी? घ्या जाणून याविषयी सविस्तर…

by Gautam Sancheti
जानेवारी 3, 2023 | 9:43 pm
in इतर
0
Vision Nashik Milletes of India

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– व्हिजन नाशिक –
“मिलेट्स कॅपिटल ऑफ इंडिया”

इंडिया दर्पण च्या सर्व वाचकांना नूतन वर्ष २०२३ च्या आरोग्यदायी आणि हार्दिक शुभेच्छा. नाशिक हे अफाट क्षमतेचे शहर आहे.  या क्षमता काय आहे हे जेव्हा आपण शोधायला लागतो तेव्हा अक्षरशः आपल्याला असंख्य हिरे, माणिक गवसतात. असाच एक हिरा आहे मिलेटस अर्थात भरडधान्य. भरडधान्यातील एक महत्वाचे धान्य आहे ते म्हणजे भगर. हीच भगर नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होते आणि संपूर्ण देशभरात विक्रीही. याचजोरावर नाशिकही मिलेटसची राजधानी बनू शकते. ती कशी हे आपण आज जाणून घेऊया….

Piyush Somani e1669791119299
श्री पियूष सोमाणी
ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.
Email ID: [email protected]
WhatsApp: 9011009700

गहू आणि भगर (मिलेट्स), ह्या दोन्ही धान्यांमध्ये मनुष्य आहारासाठी काय जास्त योग्य आहे? काही नामवंत आहारतज्ज्ञांनी (डायटिशियन) असे सांगितले आहे की, गव्हापेक्षा भगरमध्ये न्यूट्रीशन मूल्य १० पटीने जास्त आहे. गिरणी मध्ये दळून आलेला गहू आणि कमी शिजवून बनवलेली भगर, ह्यात कुठल्याही प्रकारची तुलनाच होऊ शकत नाही. कितीतरी प्रकारचे आजार दूर करण्याची श्रमता ‘मिलेट्स’ मध्ये आहे.

संयुक्त राष्ट्रांनी सन २०२३ हे “International Year of Millets” (आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष) म्हणून जाहीर केलं आहे. भरड धान्याला इंग्रजीत ‘मिलेट्स’ म्हणतात. मा. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, भारत सरकारकडून आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (IYM) २०२३ चा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्यात आला होता. या ठरावाला ७० देशांनी अनुमोदन दिलं आणि महासभेत सर्वच १९३ सदस्य राष्ट्रांनी हा ठराव बहुमताने मंजूर केला. भरडधान्यांतील जीवनसत्त्वं, पोषणमूल्यं आणि शेतीच्या दृष्टीने महत्त्व हे अन्य देशांना भारताने पटवलं. भारताच्या या प्रयत्नामुळे ३ मार्च २०२१ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरं करावयाचं ठरलं. अन्नसुरक्षा आणि पोषण यासाठी आहारात भरडधान्यं असणं महत्त्वाचं, याकडे लोकांचं लक्ष वेधणं, भरडधान्य उत्पादनांची शाश्वत वाढ करणं आणि भरडधान्यांची मागणी वाढविण्यासाठी सर्वदूर प्रचार-प्रसार करणं ही या भरडधान्य वर्षाची उद्दिष्टं आहेत.

गहू – तांदूळ वगळता इतर ज्या धान्यांवरचं नैसर्गिक आवरण भरड करून काढल्यानंतर त्यांचा वापर आहारात करता येतो त्यांना भरडधान्य म्हणतात. गेली कित्येक शतके “बाजरी, ज्वारी, नागली (नाचणी किंवा रागी), वरई, भगर, कोदो, राजगिरा” इत्यादी भरड धान्ये (मिलेट्स) आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत. ही सर्व भरडधान्ये समृद्ध जंगलाने दिलेली देणगी आहे. भरपूर आरोग्य फायद्यांसोबतच, भरड धान्ये ही कमी पाणी आणि आवश्‍यकता असलेल्या पर्यावरणासाठीही चांगली आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षामुळं जागतिक स्तरावर भरड धान्याचे उत्पादन वाढवणं, कार्यक्षम प्रक्रिया आणि वापर सुनिश्चित करण्याची भारताला संधी मिळणार आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात’ मधून नैसर्गिक धान्य आहारावर बोलताना ज्वारी, बाजरी आणि भगर यांचा निरोगी आरोग्यासाठी आहारात समावेश करण्याचे आवाहन केले आहे. त्यातही भगरीचा विशेष उल्लेख करीत त्यांनी ट्‌वीटही केले होते.

सातासम्रुदापार, नाशिकचा कांदा, नाशिकचा ताजा आणि हिरवा भाजीपाला, नाशिकची द्राक्ष, नाशिकची वाईन अशी “नाशिक” ची ओळख असताना, त्यात आणखी भर पडली आहेत ती म्हणजे नाशिकच्या “भगरी” ची. नाशिक जिल्ह्यामध्ये मध्ये वरई वर प्रक्रिया करणाऱ्या ४२ पेक्षा अधिक “भगर मिल” आहे. घोटी, इगतपुरी, जव्हार आणि शहापूर येथे हि भगर मिल आहेत. एका मिलमध्ये दिवसाला किमान ५ टन भगरीचे उत्पादन होते. पश्चिम घाटातील इगतपुरी, घोटी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, हरसूल, जव्हार, मोखाडा या आदिवासी बहुल भागात वरई (भगर) पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. हे जास्त पाऊस येणाऱ्या भागातील पिक आहे. डोंगर उतारावरील भागात, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीत लागवड केली जाते. लागवडीसाठी स्थानिक जातींचा वापर केला जातो. या पिकाला कोणत्याही रासायनिक खते, औषधे किंवा किटकनाशके वापरली जात नाहीत. त्यामुळे नैसर्गिक पिक म्हणूनच याकडे पाहिले जाते.

आदिवासी शेतकऱ्याच्या बांधावरून वरई थेट मिलमध्ये येते. कच्चा माल म्हणजे टरफलरहित भगरीचे दाणे भगर मिलमध्ये आणले जातात. भगरची प्रक्रिया म्हणजे कच्च्या मालातील टरफले, माती तसेच अनावश्यक घटक, अशुद्धता साफ करणे, भुसा काढणे म्हणजेच भगरीला पॉलिश, प्रतवारी करणे आणि पॅकेजिंग करणे इतकीच असते. मिलमध्ये भगरवर होणाऱ्या सर्व प्रक्रियांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. भगरवर पूर्णपणे स्वच्छतेच्या वातावरणात व कमीतकमी मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रक्रिया केली जाते. संपूर्ण भारतामध्ये सर्वोत्तम आणि स्वच्छता उत्पादनाची पूर्तता करण्यासाठी नाशिकमध्ये आधुनिक मशिनरींनी भगर मील सुसज्ज आहेत. भगरच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही रासायनिक किंवा पाण्याची प्रक्रिया होत नाही आणि म्हणून ते शंभर टक्के नैसर्गिक प्रक्रिया केलेले अन्न आहे.

उपवास असेल तर साबुदाणा वा फलाहाराला पर्याय म्हणून क्वचितच खाल्ल्या जाणाऱ्या भगरीला अलिकडे देशभरातूनच नव्हे तर परदेशातून मागणी वाढली आहे. एरवी, श्रावण-नवरात्रोत्सवात तेजीत असणारी भगर आता बाराही महिने ग्राहकांना हवी असते. त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे, तिच्यातील आरोग्यदायी गुणधर्म. भगर पचनाला हलकी, नो कॅलिरिज, नो शुगर आहे शिवाय वजनही वाढत नाही. मधुमेही, हृदयरोग रुग्णांसह वजन कमी करण्यासाठीही आहारतज्ज्ञांकडून भगर खाण्याचाच सल्ला दिला जातो. भगरीचे पोषण मूल्य चांगले आहे. पोहे आणि तांदूळ यांच्यातील मध्यम आहार म्हणूनही भगर उत्तम पर्याय आहे. रुग्णाला आवश्‍यक असलेली जीवनसत्त्वे भगरीतून मिळतात. शिवाय ती ऑर्गेनिक असल्याने कोणतेही दुष्परिणामाची शक्‍यता नाही.

नाशिकमधून दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, ओरिसा, झारखंड, उत्तराखंड या राज्यांमध्ये शेकडो टन भगर जाते. भगवान जगन्नाथपुरी येथे कोट्यवधी भाविकांसाठी “खीर” केली जाते, तीही नाशिकच्याच “भगरी” पासून. नाशिकमधून संपूर्ण भारतात जवळपास ९० टक्के भगर विक्री केली जाते. त्यामुळे या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. ह्या क्षेत्रामध्ये आपल्या नाशिक चे यश फूड्स प्रोससर चे महेंद्र छोरीया, अशोक भगर मिल्स चे उमेश वैश्य, आनंद ऍग्रो ग्रुप चे प्रितेश साखला, शिवाय राठी उद्योग, संचेती भगर मिल्स, पंचवटी भगर मिल्स इत्यादी अनेक प्रोससिंग युनिट्स खूप चांगले काम करीत आहेत.

‘मिलेट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेले म्हैसूरचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खाद्य आणि पोषण तज्ज्ञ डॉ. खादर वली यांनी झपाट्याने लुप्त होत असलेल्या पाच वेगवेगळ्या प्रकारच्या “मिलेट्स” ना पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आहेत. त्यांनी या पाच प्रकारच्या मिलेट्स ना “सिरिधान्य” असे नाव दिले. त्यानंतर, डॉ. खादर यांनी त्यांची नैसर्गिकरित्या लागवड करण्यासाठी ‘कडू कृषी’ (जंगल शेती) नावाची पद्धत सुचविली. ते म्हणतात की, “आपण फळे आणि भाज्या यांचा देखील आहारात समावेश करावा, पण ते सेंद्रिय पद्धतीने पिकवले पाहिजेत. पण मिलेट्स ही अशी गोष्ट आहे जी शाश्वत पद्धतीने अन्नाची गरज पूर्ण करू शकते. त्यात सर्व जीवनसत्त्वे, पोषण आणि उपचार गुणधर्म आहेत. ही देवाकडून मिळालेली देणगी आहे. व्यापक वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधनानंतर मी या टप्प्यावर आलो आहे की, आधुनिक जीवनशैलीशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना पाच प्रकारच्या मिलेट्स च्या सेवनाने नवीन जीवनदान दिले आहे.”

हरितक्रांतीपूर्वी म्हणजे १९६०-७० च्या दशकाआधी आपल्या आहारात ही सर्व “मिरॅकल मिलेट्स” म्हणजेच भरडधान्ये समाविष्ट असत. त्यामुळे लोकांचे आरोग्यसुद्धा उत्तम होते आणि त्यांची प्रतिकार शक्तीही मजबूत होती. रासायनिक पदार्थांचा बेसुमार वापरामुळे शेतीच्या सुपीकतेवर दुष्परिणाम होत असून जमिनीचा पोत आणि कसही कमी होत आहे. अशा वेळी भरडधान्यं (मिलेट्स) जमिनीचा पोत टिकवण्यात मदत करू शकतात, शिवाय पर्यावरणीय संतुलन देखील राखता येईल. पाश्‍चिमात्य आहार शैलीमुळेच ही सर्व भरडधान्ये लुप्त झाली. हे भरडधान्य बरेच वर्षे सहज टिकते आणि प्रत्येक वर्षाला त्यांची चवही वाढत जाते. जेवढे धान्य जुने तेवढा त्याचा सुगंध जास्त. भरडधान्याचे उत्पादन (मागणी) वाढविण्यासाठी आपण प्रत्येकानेच आपल्या आहारात योग्य आणि संतुलित बदल करून या “सुपर फूड” ला आपल्या दैनंदिन आहारामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने यात पुढाकार घेऊन शेतकऱ्‍यांना पुन्हा आपल्या या पारंपरिक पीक पद्धतीकडे वळवणे, त्यांचा आत्मविश्‍वास वाढवून त्यातून त्यांची शेती कशी जास्त नैसर्गिक किंवा शाश्‍वत होईल, हे पाहणे गरजेचे आहे.
नाशिकचा “भगर कॅपिटल ऑफ इंडिया” म्हणून नावलौकिक आहेच, शिवाय आपण सर्वानी प्रामाणिकपणे आपल्या नाशिकच्या सर्व क्षमतांचा पूर्ण वापर केल्यास “मिलेट्स कॅपिटल ऑफ इंडिया” म्हणून सुद्धा सन्मान प्राप्त करू शकतो.

आपल्या सूचना, अभिप्राय आणि प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
पियूष सोमाणी
ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.
Email ID: [email protected]
WhatsApp: 9011009700

Nashik Is Millets Capital of India by Piyush Somani
Column Special Article India Darpan Vision Nashik Development
Bhagar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवत महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – ४ जानेवारी २०२२

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post
Happy birthday

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - बुधवार - ४ जानेवारी २०२२

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011