शुक्रवार, ऑक्टोबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जनता भरते जीएसटी, गद्दार जातात गोहाटी..!, महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी..! आंदोलनाने वेधले सर्वांचे लक्ष

सप्टेंबर 1, 2022 | 1:02 pm
in स्थानिक बातम्या
0
08b4161e ea5f 4ea0 abb0 774b53f45455

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “५० खोके महागाई एकदम ओके !”, “जनता भरते जीएसटी, गद्दार जातात गोहाटी..!”, “महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी..!” , “महागाईने दुखते डोके, गद्दारांना ५० खोके… ५० खोके..!” “ बहुत हो गयी महंगाई की मार, चलो हटाये मोदी सरकार..!” अशा विविध घोषणांनी आज मुंबई नाका परिसर दणाणून गेला. वाढत्या महागाई विरोधात युवक राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सुचनेनुसार प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग व शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. देशातील वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वसमान्य जनतेवर आर्थिक भार देऊन रुग्णालय सेवा, शिक्षण यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावत आहे. तसेच मध्यवर्ती बँकेकडून सुद्धा व्याजदर वाढविले जात आहे. यामुळे जनता मेटाकुटीला आली असून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील बनले आहे. केंद्र व राज्य सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यावर विविध केंद्रीय संस्थांमार्फत अडकविले जात आहे. त्यामुळे देशात हुकुमशाही होत असल्याचा आरोप करत युवक राष्ट्रवादीने महागाई विरोधात आंदोलन केले.

दोन महिन्यापासून सरकार अस्तित्वात आले परंतु फोटोसेशन व्यतिरीक्त कुठलाही ठोस निर्णय मोदी सरकार व राज्य सरकार घेवु शकले नाही व महागाई,बेरोजगारी तसेच पावसामुळे पिंकाचे झालेले नुकसान हे विषय देशांतील सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाचे असुन त्याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेताना सरकार दिसत नाही.फक्त व्यक्तीद्वेशाचे राजकारण करत व जिथे सत्ता नसेल तिथे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत ब्लेकमेल करून सत्ता हस्तगत करणे या कामात व्यस्त असताना केंद्रांचे नेते दिसतात मग त्यात महाराष्ट्रात सत्ता हस्तगत करताना ५० खोक्याची चर्चा आज राज्य आणि देशभरात चालु आहे.

यावेळी महेश भामरे, प्रदेश पदाधिकारी शादाब सय्यद,जय कोतवाल, गोटू आहेर, सागर बेदरकर, दत्ता वाघचौरे, विशाल डोखे, दिनेश धात्रक, राहुल कमानकर, गौरव ढोकणे, संतोष जगताप, कपिल भावले,डॉ.संदीप चव्हाण, अभिषेक शेवाळे, जाणू नवले, अक्षय भोसले, विक्रांत डहाळे, विक्रम जगताप, हर्षल चव्हाण, सुनिल घुगे, किरण भुसारे, अक्षय पाटील, संदीप भेरे, रामेश्वर साबळे, संदीप गोतरणे,अक्षय पाळदे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अमेरिका, चीन हे विकसित देश असून भारत हा विकसनशील देश आहे. त्यामुळे भारतात महागाई निश्चित जास्त राहणार हे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना एसी रूम मधून काय कळणार, महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरली असून केंद्र सरकार जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची पिळवणूक करत आहे.
– अंबादास खैरे

Nashik Inflation Strike Agitation NCP Youth Wing

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यपाल कोश्यारी यांचे नाशकात आगमन; या कार्यक्रमाला लावणार हजेरी

Next Post

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन धाकटीवर बलात्कार करणारा गजाआड

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

crime112
क्राईम डायरी

बसस्थानक परिसरातून चोरी झालेल्या साडे तीन लाखाच्या आठ मोटारसायकली पोलिसांनी केल्या हस्तगत…

ऑक्टोबर 3, 2025
MOBILE
क्राईम डायरी

ऑनलाईन पैसे अदा केल्याचा फेक मॅसेज दाखवून पोबारा…दुकानादारांना घातला गंडा

ऑक्टोबर 3, 2025
G2P2FzVW4AAIZis 1920x1490 1
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला दिली भेट

ऑक्टोबर 3, 2025
G2QzQ01XEAAjeQw 1024x682 1
मुख्य बातमी

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात

ऑक्टोबर 3, 2025
Government of India logo
महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी…

ऑक्टोबर 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी,जाणून घ्या, शुक्रवार, ३ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 3, 2025
CM
मुख्य बातमी

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा….

ऑक्टोबर 2, 2025
jalaj sharama
स्थानिक बातम्या

अनुकंपासह एमपीएससीच्या शिफारसपात्र ४८५ उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

ऑक्टोबर 2, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन धाकटीवर बलात्कार करणारा गजाआड

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011