India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर तालुक्यातील हे रस्ते होणार चकाचक ४८ कोटींच्या निधीला मंजुरी

India Darpan by India Darpan
March 14, 2023
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा मतदारसंघातील इगतपुरी, त्रंबकेश्वर, नाशिक आणि सिन्नर या तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था दूर होऊन दळणवळणासाठी रस्त्यांचे मजबुतीकरण व्हावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.सन 2023- 24 या अर्थसंकल्पात शासनाकडून वरील तालुक्यातील रस्त्यांच्या मजबुतीसाठी सुमारे ४८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपलब्ध करून दिलेल्या ४८ कोटी रुपयांच्या निधीमुळे इगतपुरी तसेच इतर तीन तालुक्यातील रस्त्यांचे मजबूतीकरण होणार असून दळणवळण सुलभ तसेच विना आयास होणार आहे.याबरोबरच इगतपुरी,त्रंबकेश्वर या तालुक्यांमधील पर्यटन आणि धार्मिक क्षेत्राला मोठी चालना मिळण्यात असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील गावागावांमधील रस्ते मजबूत व्हावेत गाव रस्त्यांचे डांगरीकरण व्हावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे प्रयत्नशील होते. मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आदिवासी विभागाचे मंत्री विजयकुमार गावित यांची भेट घेतली होती. रस्त्यांची झालेली दुरावस्था विषयीच्या व्यथा खासदार गोडसे यांनी मंत्री महोदयांकडे मांडल्या होत्या. इगतपुरी आणि त्रंबकेश्वर या दोन तालुक्यांमध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने त्याचा पर्यटनावर किती आणि कसा परिणाम होतो हे खासदार गोडसे यांनी मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले होते.

खा.गोडसे यांची विकास कामांविषयीची तळमळ बघून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात इगतपुरी तालुक्यातील बारा रस्त्यांच्या कामासाठी तीस कोटी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चार रस्त्यांच्या कामांसाठी चौदा कोटी, नाशिक तालुक्यातील दोन रस्त्यांच्या कामांसाठी तीन कोटी तर सिन्नर तालुक्यातील एका रस्त्याच्या कामासाठी एक कोटी असे एकूण ४८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

या कामांमध्ये इगतपुरी तालुक्यातील भगुर- वंजारवाडी – मुंढेगाव रस्त्याच्या कामासाठी चार कोटी,
भंडारदरावाडी -निनावी ते साकुर फाटा रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी,
इंदोरे ते खडकेद रस्त्याच्या कामासाठी एक कोटी,
एमडीआर २५ ते जामुंडे रोडच्या कामासाठी पाच कोटी,
धामणगाव अडसरे बुद्रुक शिव ते ओडिआर १०२ च्या पूला पर्यंतच्या रस्ता कामासाठी चार कोटी,
शणित जाधव वस्ती ते व्हिआर ९२ या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी,
मोगरे ते मोगरेफाटा या रस्त्याच्या कामासाठी एक कोटीं,
धामणी -बोराचीवाडी रस्त्याच्या कामासाठी एक कोटी,
धामणी एप्रोच रोड ते व्हिआर-६ या दरम्यानच्या रस्त्यासाठी तीन कोटी,
पिंपळगाव भटाटा ते वाळविहिर या दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी,
अडवण ते अडवण फाटा या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी,
कऱ्हाळे ते अवळी दुमाला या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी,
नाशिक तालुक्यातील राजगडनगर ते दहेगाव रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी,
वासळी ते दुडगाव रस्त्याच्या कामासाठी एक कोटी,
सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे ते कासारवाडी रस्त्याच्या कामासाठी एक कोटी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेठ -तोरंगण-हरसूल – वाघेरा-आंबोली -त्र्यंबक घोटी या रस्त्याच्या कामासाठी आठ कोटी,
आडगाव -गिरणारे -वाघेरा- हरसूल -ओझरखेड या रस्त्यासाठी सहा कोटी रुपये या रस्त्यांचा समावेश आहे.

Nashik Igatpuri Trimbak Sinner Taluka Roads Fund Sanction


Previous Post

एमजी मोटरने केला भारतातील प्रवासी वाहतुकीचे सर्वेक्षण; असा आहे त्याचा धक्कादायक निष्कर्ष

Next Post

लाउडस्पीकरवर नमाज पठणाबाबत सौदी अरेबिया सरकारचा मोठा निर्णय

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

लाउडस्पीकरवर नमाज पठणाबाबत सौदी अरेबिया सरकारचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group