नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारामध्ये आज बिबट्याला जेरबंद करण्यात आले. विशेष म्हणजे वनविभागातील महिला वनकर्मचाऱ्यांनी त्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. हा बिबट्या जेरबंद झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर होता. त्यामुळे येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानंतर वनविभागाने पिंजरा लावला. आणि आता बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1609887020796768260?t=LVTbR6CE2iRbiXpVUo487g&s=03
Nashik Igatpuri Leopard Arrest by Women Forest Guard Video