नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असताना दुसरीकडे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये नाशकात होणाऱ्या भव्य विराट धम्म मिळवण्या प्रसंगी ते काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यात देशभरातून लाखो अनुयायी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे याकडे विशेष लक्ष लागले आहे. मेळाव्याच्या पूर्व संधेलाच ॲड. प्रकाश आंबेडकर नाशिक शहरात दाखल झाले आहेत.
भारतीय बौद्ध महासभेतर्फे शनिवार दिनांक १७ डिसेंबरला गोल्फ क्लब ईदगाह मैदानावर विराट धम्म मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून एक लाखांहून अधिक अनुयायी उपस्थित राहतील,अशी माहिती आयोजक भारतीय बैध्द महासभा नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रवीण बागुल, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार व महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिली आहे.
धम्म मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख सल्लागार ॲड.बाळासाहेब आंबेडकर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर, अंजली ताई आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर , अशोक सोनवणे, राजेंद्र पतोडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंकीताई शेख, मोहनभाऊ अढांगळे,वामनदादा गायकवाड, जगदीश गवई,एस.के. भंडारे,ॲड एस.एस.वानखेडे,भिकाजी कांबळे, देवशाला गायकवाड,संबोधी सोनकांबळे,प्रभाकर नांदेडकर उपस्थित राहणार असून या सर्वांचे विचार ऐकण्याची नामी संधी उपस्थितांना प्राप्त होणार असल्याने या धम्म मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Nashik Idgah Maidan Virat Dhamma Melava Today