बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

होमेथॉन प्रदर्शनात घर बुक करा आणि मिळवा चांदीचे नाणे; आजपासून रविवारपर्यंत नामी संधी

by Gautam Sancheti
डिसेंबर 22, 2022 | 12:00 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221220 WA0030

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नरेडकोच्या ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शनाचा आज (२२ डिसेंबर) पासून शुभारंभ होत आहे. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील व वाजवीदराच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको)तर्फे २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शन गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाटन नरेडकोचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बांधकाम क्षेत्रातील अर्ध्वयू डॉक्टर निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते होणार असून नरेडको नॅशनल प्रेसिडेंट श्री.राजन बांदलकर यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे, अशी माहिती नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड आणि समन्वयक जयेश ठक्कर यांनी दिली.

उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमा हिरे,विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्हाधिकारी गंगाधरन.डी, मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे,जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी असिमा मित्तल,आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड या उपस्थित राहणार आहेत.

४ कोटींपर्यंतची घरे
आपल्या स्वप्नातील घर व्हावे त्यांच्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे एकप्रकारची पर्वणीच असून नाशिक, मुंबईसह नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे त्यांना उपलब्ध होईल, अपार्टमेंट्स, शॉप्स, ऑफिसेस यासाठी स्मार्ट सिटी नाशिक मध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी आहे.सर्वांना परवडणारी घरे या प्रदर्शनात असणार असून १५ लाखांपासून ते ४ कोटी रुपया पर्यंतची घरे या प्रदर्शनात नागरीकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.या प्रदर्शनामुळे रिअल इस्टेट आणि ग्राहक दोघांनाही फायदा होणार आहे.

दररोज लकी ड्रॉ
“लिव्ह – इन्व्हेस्ट – ग्रो” हि नरेडकोची संकल्पना आहे. हे प्रदर्शन म्हणजे एकप्रकारची पर्वणीच असून मुंबईसह नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांचे सगळे प्रकल्प एकाच छताखाली ग्राहकांना नरेडकोच्या या प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत. “बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना इथे विशेष सवलती असतील, बँकिंग पार्टनर्स देखील ग्राहकांना विशेष सवलत देणार आहेत. स्पॉट बुकिंग करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एक चांदीचं नाणं या ठिकाणी भेट मिळणार आहे जितके लोक एक्झिबिशन बघायला येतील त्यापैकी एका भाग्यवंताला दररोज दर तासाला तेजस्वी ज्वेलर्स तर्फ़े लकी ड्रॉ द्वारे चांदीचं नाणं मिळणार आहे”. प्रॉपर्टी व्यतिरिक्त याठिकाणी बांधकाम मटेरियल, इंटिरियर मटेरियलचे स्टॉल असणार आहे. विविध बँकांच्या स्कीम सवलती सुविधा इथे ग्राहकांना एकाचवेळी समजतील.

बँकांचेही स्टॉल्स
प्रदर्शनात नाशिक मुंबईतील नामवंत बिल्डर्सचे स्टॉल्स असून बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक साहित्ये यांये स्टॉल्सही येथे असणार आहेत. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे दीपक चंदे असून सह प्रायोजक म्हणून सिटी लिफ्ट, इन्व्हेरो,केनेस्ट यांचे सहकार्य मिळाले असून घर घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ही नरेडकोची बँकिंग पार्टनर असून एचडीएफसी आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आदी बँकांतर्फे कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सर्वांसाठी खुले
डोंगरे वसतिगृह मैदानावर २२ ते २५ डिसेंबर पासून नागरीकांना खुले असून जास्तीत जास्त नागरीकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन नरेडकोचे सचिव सुनील गवादे,सह सचिव शंतनू देशपांडे यांनी केले आहे. “होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो २०२२ “यशस्वी होण्यासाठी अविनाश शिरोडे, पुरुषोत्तम देशपांडे,राजेंद्र बागड भाविक ठक्कर,अश्विन आव्हाड, प्रशांत पाटील, नितीन पाटील, मयूर कपाटे, भूषण महाजन, श्रीहर्ष घुगे, प्रयत्नशील आहेत.

७ एकरमध्ये प्रदर्शन
नरेडकोच्या ४ चाप्टर मधील नाशिक पश्चिम विभागातील हे पहिलेच प्रदर्शन आहे. गृहस्वप्न बाळगणाऱ्यांना नाशिक, मुंबईसह नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे उपलब्ध होईल, विशेष म्हणजे हे प्रदर्शन ७ एकर मध्ये होत आहे, त्यात ४ डोममध्ये होणार असून त्यात १२५ हून अधिक स्टॉल्स आहेत. बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक अत्याधुनिक साहित्यांचे स्टॉल्सही येथे साकारण्यात येत आहे.

नरेडकोतर्फे भेट
महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही स्टाॅलवर घर बुक करणाऱ्यास लगेचच नरेडकोतर्फे चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे. प्रदर्शनास भेट देण्यास येणाऱ्यांनाही नरेडकोतर्फे लकी ड्रॉद्वारे एक भेट मिळणार आहे. या प्रदर्शनासाठी सहप्रायोजक म्हणून सिटी लिफ्ट, इन्व्हेरो, केनेस्ट यांचे सहकार्य मिळाले असून घर घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ही नरेडकोची बँकिंग पार्टनर असून एचडीएफसी आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आदी बँकांतर्फे कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे

Nashik Homethon Real Estate Property Expo From Today
Naredco
Exhibition Home Booking Silver Coin Gift

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चौथ्या दिवशीही महाविकास आघाडी आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिल्या या घोषणा

Next Post

मध्यरात्री २ वाजता भाऊ चौधरींचा शिंदे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कामे अर्धवट सोडू नये, जाणून घ्या, बुधवार, १० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 9, 2025
Gyj9FwXXMAAG8KV
महत्त्वाच्या बातम्या

उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी…पडली इतकी मते

सप्टेंबर 9, 2025
‘नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित 2 1024x757 1
संमिश्र वार्ता

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतके कोटी रुपये जमा

सप्टेंबर 9, 2025
IMG 20250909 WA0402 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्या उद्घाटन…केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, मंत्री भुजबळ, महाजन यांची विशेष उपस्थिती

सप्टेंबर 9, 2025
NMC Nashik 1
स्थानिक बातम्या

नाशिक महानगरपालिकेत प्रभाग रचनेवरील ९१ हरकतीवर सुनावणी संपन्न…

सप्टेंबर 9, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
संमिश्र वार्ता

नेपाळसारखी दुर्घटना कोणत्याही देशात घडू शकते! सावध राहा!…संजय राऊत यांचे ट्विट

सप्टेंबर 9, 2025
bhujbal 11
संमिश्र वार्ता

छगन भुजबळांची नाराजी कायम…मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले हे पत्र

सप्टेंबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

घर गहाण प्रकरणात दहा लाखाला गंडा….अशी केली फसवणूक

सप्टेंबर 9, 2025
Next Post

मध्यरात्री २ वाजता भाऊ चौधरींचा शिंदे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011