India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक : इतके अर्ज बाद

India Darpan by India Darpan
January 13, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 29 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. त्यापैकी सात उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे नामंजूर झाली आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे. नामनिर्देशन पत्रे दाखल करणाऱ्या 29 उमेदवारांपैकी सात उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे नामंजूर झाली असून 22 उमेदवार शिल्लक आहेत.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. प्रस्थापित पक्षांचा कुणीही उमेदवार रिंगणात नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे. तसेच, त्यांना सर्वपक्षाचा पाठिंबा मिळाल्यास त्यांच्या विजयाची चिन्हे आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार दि.12 जानेवारी,2023 रोजी 20 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन पत्र सादर केले होते. त्यामुळे 29 उमेदवारांचे 44 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. काल शेवटच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये नितीन नारायण सरोदे,नाशिक व संजय एकनाथ माळी,जळगाव, राजेंद्र दौलत निकम, नाशिक यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले होते. दादासाहेब हिरामण पवार, नाशिक यांनी हिंदूस्तान जनता पार्टी पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले होते.

भागवत धोंडीबा गायकवाड यांनी अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशन पत्र सादर केले. रतन कचरु बनसोडे, नाशिक यांनी वंचित बहुजन आघाडीतून नामनिर्देशन पत्र सादर केले असून डॉ.सुधीर सुरेश तांबे,पनवेल,जि.रायगड यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र अर्ज सादर केले. पोपटराव सीताराम बनकर,अहमदनगर यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले. बाळासाहेब घोरपडे,नाशिक यांनी अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशन पत्र सादर केले होते. अविनाश महादू माळी, नंदूरबार, इरफान मोहमंद इसाक,नाशिक ,सुनिल शिवाजी उदमळे,अहमदनगर यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले.

सुभाष राजाराम जंगले,अहमदनगर व अमोल बाबासाहेब खाडे, अहमदनगर यांनी प्रत्येकी दोन अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले. धनराज देविदास विसपुते, धुळे यांनी भारतीय जनता पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले. तसेच सत्यजित सुधीर तांबे, अहमदनगर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून व अपक्ष म्हणून असे दोन नामनिर्देशन पत्र सादर के. शरद मंगा तायडे, नाशिक यांनी बहुजन समाज पार्टी, नाशिक या पक्षातून दोन नामनिर्देशन पत्रे सादर केले.

राजेंद्र मधुकर भावसार,धुळे, यशवंत केशव साळवे,नाशिक, धनराज देविदास विसपुते,धुळे, छगन भिकाजी पानसरे, अहमदनगर, अनिल शांताराम तेजा यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केली आहेत. तसेच धनजंय कृष्णा जाधव,अहमदनगर यांनी भारतीय जनता पक्षातून व अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले असून बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक यांनी भारतीय जनता पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले. दि.10, 11 व 12 जानेवारी,2023 या तीन दिवसात 29 उमेदवारांनी नामनिर्देशन 44 अर्ज सादर केले होते.

Nashik Graduate Constituency Election Application Invalid
Vidhan Parishad


Previous Post

‘तुम्हाला लाखो वेळा विकत घेईन, तुम्हाला विकून टाकीन’, भामटा ललित मोदीची धमकी कुणाला आणि का?

Next Post

‘सत्तेच्या गाजराची पुंगी निकामी झाल्याने महाविकास आघाडीची तिघाडी बिघडली!’ भाजपचा टोला

Next Post

'सत्तेच्या गाजराची पुंगी निकामी झाल्याने महाविकास आघाडीची तिघाडी बिघडली!' भाजपचा टोला

ताज्या बातम्या

देशात आता तयार होणार कृत्रिम हिरे! अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली ही मोठी घोषणा; असे बनतात हे हिरे…

February 2, 2023

अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी किती निधी मिळाला? कुठले मार्ग होणार?

February 2, 2023

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने बोलावली ५० आमदारांची बैठक; चर्चांना उधाण

February 2, 2023

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group