नाशिक – गेल्या काही दिवसांपासून नाशिककर अत्यंत प्रतिकूल वातावरणाचा सामना करीत आहेत. मात्र, आज सकाळी नाशिककरांना अत्यंत सुखद धक्का मिळाला आहे. पहाटेपासूनच दाट धुक्याच्या चादरने नाशिकला लपेटले आहे. त्यामुळेच आज घराबाहेर डोकावणाऱ्यांना सूर्यदर्शन न होता चक्क दाट धुके पहायला मिळत आहे. हे धुके केवळ पहाटे पर्यंतच नव्हते तर सकाळचे साडेनऊ झाले तरी धुक्याची चादर कायम आहे. त्यामुळेच वाहने चालविणाऱ्यांना हेडलाईटद्वारेच मार्ग काढावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या हवामानाला तोंड देणाऱ्या नाशिककरांना आज आपण जणू एखाद्या बर्फाळ प्रदेशातच असल्याची अनुभूती येत आहे. बघा हा अप्रतिम व्हिडिओ