India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

संतप्त शेतकऱ्याने पाच एकर कोबी पिकावर फिरविला नांगर

India Darpan by India Darpan
March 1, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. आज नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या कोबी पिकला केवळ १ रुपया भाव मिळत असल्याने तसेच ते पिक काढण्यासाठी काढणीचा खर्च देखील परवडत नसल्याने आपल्या ५ एकर क्षेत्रातील कोबी पिकावर ट्रॅकरच्या सहायाने नांगर फिरविला आहे.

पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी कोबी लागवडीसाठी प्रती एकर ५० हजार रुपये खर्च केला आहे. एकूण पाच एकर कोबी लागवडीसाठी त्यांचा २.५० लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र कोबी पिकाला केवळ १ रुपये भाव मिळत असल्याने त्यांनी आज शासनाचा निषेध नोंदवीत आपल्या ५ एकर कोबी पिकावर नांगर फिरविला आहे. तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही तर शेतकरी पुन्हा एकदा संपावर जातील असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

राज्यातील कांदा, द्राक्ष यासह विविध शेतमाल पिकविणारा शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे. ही अतिशय दु:खाची बाब आहे. मला राज्यातील शेतकऱ्यांना सांगायचे आहे. आपण कुठल्याही परिस्थित खचून न जाता आत्महत्या करू नये. शासनाला आपली दखल घ्यावीच लागणार आहे. जर शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत केली नाही तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ असे अंबादास खैरे यांनी म्हटले आहे.

मी एक सुज्ञ युवा शेतकरी असून आपण कुठल्याही परिस्थितीत खचणार नाही. शेतकऱ्यांच्या वतीने या शासनाला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भाग पाडले जाईल. सरकारने शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे. अन्यथा शासनाला पळता भुई थोडी करू…
– शेतकरी अंबादास खैरे

Nashik Farmer 5 Acre Cauliflower Destroy


Previous Post

अब्जाधीश एलन मस्कचे होर्डिंग्ज लावून पुजा; बंगळुरूत हे का केलं जातंय? (Video)

Next Post

ठाकरेंना आणखी अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेची अशी आहे आता आक्रमक रणनिती

Next Post

ठाकरेंना आणखी अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेची अशी आहे आता आक्रमक रणनिती

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group